Home Cleaning Tips: दिवाळीसाठी घराची साफसफाई करायची आहे? मग, वेळ आणि मेहनत वाचवणाऱ्या ७ सोप्या टिप्स नकी फॉलो करा

Shruti Vilas Kadam

साफसफाईचे आधी नियोजन करा

संपूर्ण घराची स्वच्छता एकाच दिवशी करण्याऐवजी कामांची विभागणी करा. पहिल्या दिवशी बेडरूम, दुसऱ्या दिवशी किचन आणि त्यानंतर हॉल व बाथरूमची स्वच्छता करा. यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाचतील.

Diwali Home Cleaning | saam tv

अनावश्यक वस्तू घरातून काढून टाका

कपाटातील जुने कपडे, वर्तमानपत्रे, रिकामे डबे आणि वापरात नसलेल्या वस्तू वेगळ्या करा. गरजू व्यक्तींना देता येणाऱ्या वस्तू दान करा. यामुळे घरातील पसारा कमी होईल आणि स्वच्छता करणे सोपे जाईल.

home cleaning remedies

पंखे आणि खिडक्या साफ करा

पंख्यांच्या पात्यांवर आणि खिडक्यांच्या चौकटींवर धूळ साचते. लाईट बंद करुन पंखा साफ करा. खिडक्यांच्या काचा पुसण्यासाठी मायक्रोफायबर कापड किंवा योग्य ग्लास क्लीनरचा वापर करा.

Home cleaning | Saam Tv

किचनमधील तेलकटपणा साफ करा

गॅस शेगडी, किचन टाइल्स आणि चिमणीवर तेलकट थर साचतो. तो काढण्यासाठी क्लीनर किंवा भांडी धुण्याचे लिक्विड वापरा. साफ सफाई करताना लाईट नेहमी बंद करा.

Home Cleaning Tips | Saam Tv

सोफा आणि गाद्या स्वच्छ करा

सोफा, गाद्या आणि कार्पेटवर धूळ, केस आणि लहान कण साचतात. व्हॅक्यूम क्लीनरच्या मदतीने या वस्तू स्वच्छ करा. किंवा सर्फच्या पाण्याने नीट साफ करा. बेकिंग सोडा किंवा कोणतेही नविन क्लीनिंग प्रोडक्ट वापरण्यापूर्वी छोट्या भागावर ट्राय करा

Home Cleaning | GOOGLE

बाथरूम आणि नळ स्वच्छ करा

बाथरूममधील टाइल्स, बेसिन आणि नळांवर पाण्याचे डाग साचतात. हे डाग साफ करताना चांगला मऊ ब्रश वापरा. बाथरूम स्वच्छ केल्यानंतर पाणी काढून टाका आणि जागा कोरडी होऊ द्या.

Bathroom cleaning | pinterest

शेवटी फरशी आणि सजावटीची तयारी करा

सर्व कपाटं, पंखे, खिडक्या आणि फर्निचर स्वच्छ झाल्यानंतर फरशी झाडून पुसा. फरशी पूर्ण कोरडी झाल्यावर दिवे, तोरणे, पणत्या आणि इतर सजावटीच्या वस्तू लावा. यामुळे घर अधिक स्वच्छ आणि प्रसन्न दिसेल.

Home Cleaning tips

Plank Benefits: खरचं वजन कमी करायचं आहे? मग सुरुवात करा 'या' व्यायामाने, मिळेल पॉझिटिव्ह बदल

Plank Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा