Ulhasnagar Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

उल्हासनगरात गावगुंडांनी दोन दुचाकी पेटवल्या; दोघांना बेड्या

कॅम्प ३ मधील मिलींद नगर परिसरात घडली घटना

अजय दुधाणे

बदलापूर - उल्हासनगरात (Ulhasnagar) जुन्या वादातून गावगुंडांनी २ दुचाकी पेटवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी २ गावगुंडांना मध्यवर्ती पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या. उल्हासनगरच्या कॅम्प ३ मध्ये अनिल अशोक टॉकीज समोर मिलींद नगर परिसर आहे. या परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला.

हे देखील पाहा -

याठिकाणी राहणारा आकाश शिंदे हा पप्पू गार्डन इथे फिरण्यासाठी गेला असताना तिथे विकी आणि गोलू या दोघांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून आकाशला बेदम मारहाण केली. त्यांच्या तावडीतून सुटून आकाश हा घराच्या दिशेने पळाला. त्याचा पाठलाग करत आरोपी विकी आणि गोलू हे आकाशच्या घरापर्यंत आले.

मात्र तिथे आकाश न दिसल्यानं या दोघांनी आकाशच्या घराबाहेर उभ्या असलेल्या दोन दुचाकींवर पेट्रोल ओतून आग लागली. या आगीत दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी मनजीत उर्फ गोलू लबाना आणि विकी सैनी यांना अटक केली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT