Heatwave in Mumbai | Mumbai temperature Updates
Heatwave in Mumbai | Mumbai temperature Updates Saam Tv
मुंबई/पुणे

येत्या 5 दिवसात काही भागात उष्णतेची लाट जाणवेल; हवामान विभागाची माहिती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहेत. काही भागात उष्णतेची लाट (Heat wave) जाणवत आहे. येणाऱ्या चार दिवसात जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी अन्य जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट (Heat wave) जाणवेल. महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात काही भागात उष्णतेची लाट जाणवेल असा इशारा हवामान विभागाने (Meteorological Department) दिला आहे.

उष्णतेची लाट 27 मार्च ते 30 मार्च या चार दिवसात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये जाणवणार आहे. या जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याची आवाहन हवामान विभागाने (Meteorological Department) केले आहे.

Meteorological Department
Meteorological Department

27 मार्च 2022

रविवार 27 मार्च रोजी बुलडाणा, अकोला या दोन जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट (Heat wave) जाणवेल असा इशारा हवामान विभागाने (Meteorological Department) दिला आहे. या जिल्ह्यातील लागरिकांनी योग्या ती काळजी घेण्याचे आवाहनही केली आहे.

28 मार्च 2022

बुलडाणा, अकोला या दोन जिल्ह्याना दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 मार्च 2022 रोजी उष्णतेची लाट जाणवेल असं सांगितले आह.

29 मार्च 2022

29 मार्च रोजी दहा राज्यातील जिल्ह्यांना हवामान विभागाने (Meteorological Department) इशारा दिला आहे. जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वाशीम, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवेल.

30 मार्च 2022

30 मार्च रोजीही महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना उष्णतेची लाट (Heat wave) जाणवेल. यात जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वाशीम, अकोला, अमरावती या जिल्ह्यांचा समावेशा आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gujarat News: दहावीत मिळवले ९९.७० टक्के गुण, बोर्डातील टॉपर; निकालानंतर चौथ्या दिवशी विद्यार्थिनीचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू

नवी मुंबई : बनावट नोटांच्या छापखान्यावर पाेलिसांची धाड, 2 लाखांच्या नाेटा जप्त; युवकावर गुन्हा दाखल

Today's Marathi News Live : शेवाळेवाडीत कंटेनरचा अपघात, चालक आणि क्लीनरचा मृत्यू अपघातात मृत

SSC, HSC Result: दहावी-बारावीचा निकाल कधी जाहीर होणार? शिक्षण मंडळाने दिली अत्यंत महत्वाची माहिती

Hording Collapse : पुणे-सातारा महामार्गाजवळ होर्डिंग कोसळलं; परिसरात आणखी छोटे-मोठे होर्डिंग, नागरिकांनी व्यक्ती केली भीती

SCROLL FOR NEXT