120 Mumbai Police Corona Positive
120 Mumbai Police Corona Positive Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Police: गेल्या 24 तासांत 120 पोलिसांना कोरोना, तर एकाचा मृत्यू...

सुरज सावंत

मुंबई: देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून मुंबईतही अगोदरपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत. याचाच फटका बसतोय तो म्हणजे फ्रंटलाईन वर्कर्स आणि पोलीस यांना. मुंबईत (Mumbai) गेल्या 24 तासांत 120 पोलीस कर्मचारी (Mumbai Police) कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळले आहेत तर एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत 126 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकुण 643 पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत. (Mumbai Police Corona Positive)

हे देखील पहा -

सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

राज्यात गेल्या 24 तासांत 33 हजार 470 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 29,671 कोरोनमुक्त झाले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 69,53,514 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.98 टक्के आहे.

गेल्या 24 तासात 8 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.04 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 2,06,046 रुग्ण अॅक्टीव आहेत. आतापर्यंत 1,41,647 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी कोरोनाची तिसरी लाट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कमी होईल असे संकेत देखील दिले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakul Singh : असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान

Home Remedies: उष्णता वाढल्याने जिभेला फोड आले आहेत? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेच २०२९ पर्यंत मुख्यमंत्री राहतील; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा दावा

Love Marriage Tips : लव्ह मॅरेज करताय? सासूबाईंना इंप्रेस करण्यासाठी खास टीप्स

Airtel Data Plans: 'हे' आहेत एअरटेलचे ५ स्वस्त डेटा रिचार्ज प्लान! पहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT