pune crime news
pune crime news  saam tv
मुंबई/पुणे

Pune | खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून शासकीय अधिकाऱ्याने संपविले जीवन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: व्याजाने घेतलेले पैसे परत मिळविण्यासाठी सावकारांने सतत लावणाऱ्या तगाद्याला कंटाळून सहकार विभागातील एका अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गणेश शंकर शिंदे वय ५२ वर्ष राहणार बालाजी हाईट्‌स, मंगळवार पेठ असं आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

या अधिकाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी विजय सोनी, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे, मनीष हाजरा यांना अटक केली आहे. तसंच विजय सोनी याचे वडील, पंधरकर, शंकर लक्ष्मण गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत शिंदे यांच्या पत्नी शोभना शिंदे यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे.

पाहा व्हिडीओ -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश शिंदे हे मुंबई येथे सहकार खात्यामध्ये कामाला होते. त्यांची व संशयित आरोपी क्षीरसागर, सोनी, हाजरा, साळुंखे, पंधरकर यांच्याशी ओळख होती. शिंदे यांनी आर्थिक अडचणीमुळे प्रारंभी एक लाख रुपये संबंधित सावकारकडून घेतले होते. त्या शिंदे यांनी वेगवेगळ्या सावकारांकडून घेतलेली रक्कम 84 लाख 50 हजार रुपयांपर्यंत पोचली. त्यामुळे व्याजसह मुद्दल परत करण्यास शिंदेंना उशीर होऊ लागल्याने सावकारांनी पैसे लवकर परत दे असा तगादा लावला.

तसंच पंधरकर याने शिंदे आवश्‍यक कर्ज मंजुर करण्याचे आमिष दाखविले होते. पंधरकर याने कर्जमंजुरीसाठी शिंदे यांच्याकडून पैसेही स्विकारले आणि ऐनवेळी पंधरकरने कर्ज मंजुरीला नकार दिल्यामुळे आणि अन्य व्यक्तींकडूनही घेतलेल्या पैशांची मागणी केली जात असल्याच्या तगाद्याला कंटाळून.

शिंदे यांनी सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पत्नी मुलींना शाळेत सोडण्यासाठी गेल्या, त्या 15 मिनीटांनी पुन्हा घरी आल्या असता त्यांना शिंदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं दिसलं. दरम्यान, त्यांनी मृत्युपुर्वी चिठ्ठी लिहीली असून ती चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. शिवाय याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज अभंग करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT