पुण्यात लसीकरणानंतरही 41 कोरोना रुग्णांचा मृत्यू  Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात लसीकरणानंतरही 41 कोरोना रुग्णांचा मृत्यू

पहिला डोस घेतलेल्या 21 जणांचा तर दुसरा डोस घेतलेल्या 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

अमोल कविटकर, पुणे

पुणे: देशात 16 जानेवारीला सर्वत्र लसीकरणाला (Covid-19 Vaccination) सुरुवात झाली. त्यानंतर कधी वेगात तर कधी मंद गतिने लसीकरण सुरु आहे. भारतात सध्या स्वनिर्मीत दोन लसी आहेत. त्याच्या जोडीला काही परदेशी लसी देखील आहेत. परंतू आता एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. पुण्यात लसीकरणानंतर 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. त्यात पहिला डोस घेतलेल्या 21 जणांचा तर दुसरा डोस घेतलेल्या 20 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 20 लाख 65 हजार 440 तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 7 लाख 42 हजार 923 एवढी आहे.

दरम्यान मागिल काही दिवसात महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. त्यामुळे टप्याटप्याने महाराष्ट्रात अनलॅाक करण्यात आले आहे. पॅाझिटिव्हिटीच्या दरावरुन निर्बंध कसे असतील हे ठरवण्यात आले आहे. त्यामध्ये पुणे जिल्हा हा तिसऱ्या लेव्हलमध्ये आहे. त्यामुळे व्यापारी वर्गातून मोठी नाराजी व्यक्त केली होती. परंतू, मागच्या आढावा बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांनी निर्बंध शिथील करण्याचे आदेश दिले होते.

पुणे शहर आणि ग्रामिण भागातील कोरोना परिस्थिचा आढावा आज पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यात पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट 2.57 टक्क्यांवर स्थिर आहे. तर पुणे शहरात 6.96 टक्के ऑक्सिजन बेड्स भरलेले आहेत. ग्रामिण भागाचा विचार केला तर पॉझिटिव्हिटी रेट घटून 3.94 टक्क्यांवर आला आहे. चिंताजनक गोष्ट म्हणजे ग्रामिण भागातील 95 गावे अजूनही कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत.

पुणे शहरात अजूनही 100 टक्के अनलॅाक झालेले नाही. आज झालेल्या आढावा बैठकीत अजित पवार यांनी निर्बंध जैसे थे ठेवण्यात आले आहे. पुण्यात अजूनही स्विमिंगपुल बंद आहेत. त्याचबरोबर मंदीरं, चित्रपटगृह, नाट्यगृह देखील बंद आहेत. यांना दिलासा मिळतो का? याकडेही पुणेकरांचं लक्ष होतं.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT