Crime : पिंपरी मध्ये दारूच्या खंब्यासाठी जोरदार राडा, दुकानदाराला मारहाण! गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

Crime : पिंपरी मध्ये दारूच्या खंब्यासाठी जोरदार राडा, दुकानदाराला मारहाण!

पिंपरी शहरातील रिगल वाईन्स शॉप मध्ये दारूड्यांनी दारू दुकानदारास फ्री स्टाईल मारहाण करत, दारू दुकानाची मोठी तोडफोड केली आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : पिंपरी शहरातील रिगल वाईन्स शॉप मध्ये दारुड्यांनी दारू दुकान दाराला फ्री स्टाईलने जोरदार मारहाण करत, दारू दुकानाची मोठी तोडफोड केली आहे. दारू दुकानादाराला दारुडे मारहाण करत असल्याची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. तर, दारुडे दुकाना बाहेर तोडफोड करत असतानाची दृश्य रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केली आहेत.

हे देखील पहा :

पिंपरी-चिंचवड शहरातील अशोका थिएटर जवळील रिगल वाईन्स मध्ये ही मारहाण आणि तोंडफोडीची घटना काल रात्री 9 वाजता दरम्यान घडली आहे. रिगल वाइन मध्ये चार दारुडे दारू घेण्यासाठी आले होते. त्यावेळेस त्यांच्या कडे फक्त 700 रुपये होते.

मात्र, ते 700 रुपयांपेक्षा जास्त किमतीची दारू खंबा दुकानदाराला मागत असल्याने, झालेल्या वादात ही मारहाण आणि तोडफोड करण्यात आली आहे. दारुड्यांनी हातात लोखंडी पाइप घेऊन रीगल वाईन्सची तोडफोड केली आहे. या प्रकरणात कीर्ती लक्ष्मण राजपूत यांच्या तक्रारीवरून चारही दारुड्या विरोधात पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस मारहाण आणि तोडफोड करणाऱ्या दारुड्यांचा शोध घेत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

SCROLL FOR NEXT