crime Saam Digital
मुंबई/पुणे

Thane crime : धक्कादायक! हुंड्यासाठी छळ, सासरच्यांनी सूनेला थेट ६ व्या मजल्यावरून ढकललं

Vishal Gangurde

ठाणे : ठाण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील मुंब्र्यामध्ये सासरच्या मंडळींनी सूनेला थेट ६ व्या मजल्यावरून ढकलल्याची घटना घडली आहे. या घटनेत ४० वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. रुग्णालयाने हा प्रकार पोलिसांना कळवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. महिलेला ढकलल्याचा प्रकार ३१ जुलै रोजी घडला असून या गुन्ह्याची नोंद शुक्रवारी झाली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती हा रिक्षा चालक आहे. या महिलेचं लग्न सात महिन्याआधी झालं. लग्न झाल्यानंतर सासरच्या मंडळीकडून या ४० वर्षीय महिलेचा हुंड्यासाठी छळ सुरु होता. महिलेला माहेरच्या मंडळीकडून हुंडा आणण्यासाठी दबाव टाकला होता.

४० वर्षीय महिलेचा घरात पती, सासू, दीर, नणंद यांच्याशी ३१ जुलै रोजी हुंड्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. क्षणभरात कुटुंबातील वाद टोकाला गेला. कडाक्याच्या भांडणानंतर सासरच्या मंडळीनी ४० वर्षीय महिलेला थेट घराच्या बाल्कनीतून ढकलून दिलं. ६ व्या मजल्यावरून ढकल्यानंतर महिला गंभीर जखमी झाली. या महिलेला स्थानिकांनी तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, '४० वर्षीय महिलेचे मुंब्रा येथे उपाचर सुरु होते. पुढे मुंब्रा येथील रुग्णालयात उपचार केल्यानंतर या महिलेला मुंबईतील एका रुग्णालयात हलविण्यात आलं. त्यानंतर मुंबईतील रुग्णालयाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी महिलेच्या जबाबावरून सासरच्या मंडळीविरोधात पोलिसांत गुन्हा नोंद केला. दरम्यान, पोलीस पुढे म्हणाले, 'या महिलेच्या पतीचा दावा आहे की, त्याची बायको आत्महत्या करण्याची धमकी द्यायची. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

मानखुर्दमध्ये डॉक्टर महिलेला धमकी

मुंबईच्या मानखुर्दमधून धक्कादायक प्रकार समोर आला आगे. मुंबईच्या मानखुर्दमध्ये एका व्यक्तीने एका डॉक्टर महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. कोलकातामधील डॉक्टरसारखी स्थिती करू, अशी धमकी मानखुर्दमधील व्यक्तीने डॉक्टर महिलेला दिली. डॉक्टर महिलेला धमकी मिळाल्यानंतर साठेनगर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ट्रॅफिकमध्ये कार अडकली, खासदार सुप्रिया सुळेंनी केली बाईकवारी; VIDEO होतोय व्हायरल

Yuvraj Singh News : युवराज बनला विराटचा शेजारी, मुंबईत खरेदी केलं अलिशान घरं; किंमत वाचून व्हाल थक्क

Bigg Boss Marathi : निक्कीच्या प्रेमात अरबाजची तहान भूक हरपली, मनधरणी करत म्हणाला…

Relationship Tips : रोजच्या भांडणांमुळे नातं तुटण्याची भीती वाटतेय? आजपासून 'या' टिप्स नक्की फॉलो करा

IND vs BAN: कर्णधार सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा; पहिल्या सामन्यात 'हा' फलंदाज करणार ओपनिंग!

SCROLL FOR NEXT