अंबरनाथमध्ये चोरट्यांनी मंदिरातली दानपेटी लांबवली अजय दुधाणे
मुंबई/पुणे

अंबरनाथमध्ये चोरट्यांनी मंदिरातली दानपेटी लांबवली

अंबरनाथमध्ये चोरट्यांनी मंदिरातली दानपेटी लांबवली आहे. खुंटवलीच्या हनुमान मंदिरातली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये चोरट्यांनी थेट मंदिराच्या दानपेटीवरच डल्ला मारल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या खुंटवली भागातील हनुमान मंदिरात ही चोरी झाली आहे. याबाबात अद्यापही पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. (In Ambernath, thieves stole the donation box from the temple)

हे देखील पहा -

हनुमान मंदिरात दैनंदिन पूजाअर्चा करणारे पुजारी हे मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास मंदिर बंद करून निघून गेले. त्यानंतर ११.३० च्या सुमारास पुन्हा हे पुजारी मंदिरालगतच्या खोलीत येऊन झोपले. याच कालावधीत मंदिरात दोन अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला आणि मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारला. दानपेटीचं कुलूप तोडून त्यातून चिल्लर रक्कम या चोरट्यांनी चोरून नेली. यावेळी हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झालेत.

सकाळी मंदिर उघडल्यानंतर हा सगळा प्रकार पुजाऱ्यांच्या लक्षात आला. दरम्यान, दानपेटीत नक्की किती रक्कम होती, हे सांगणं कठीण असलं, तरी त्यात ४० ते ५० हजार रुपयांची रोख रक्कम असेल, असा दावा मंदिराच्या पुजाऱ्यांनी केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT