>> रुपाली बडवे
क्षमता असूनही शरद पवार हे शेवटच्या क्षणी माघारी फिरतात. पंतप्रधानपद हताशी येतानाही ते माघारी फिरले. हा त्यांचा स्वभाव अजूनही समजत नाही, असं सांगत प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार हे इतिहासात कितीदा संधी असून ते माघारी फिरले याचा पाढाच वाचून दाखवला.
शरद पवार पहिल्यांदा २००४ मध्ये भाजप सोबत जाणर होते. प्रमोद महाजन आणि आम्ही एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली. दिल्लीत माझ्या घरी ही बैठक झाली, असं पटेल म्हणाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अडवाणी वाजपेयी यांच्या सूचनेनुसार ही मिटींग झाली होती. या बैठकीबाबत गोपीनाथ मुंडे खूप आनदी होते. पण प्रमोद महाजन यांना ही युती नको होती. शरद पवार यांचे राज्यात राजकीय वजन वाढेल म्हणून प्रमोद महाजन यांना हे नाको होतं. आपले वरिष्ठ शरद पवार यांच्या सोबत जातील तर महाराष्ट्रातल वजन कमी होईल, ही भीती प्रमोद महाजन याना होती. म्हणून महाजन यांनी ही बातमी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे लीक केली. यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर आरोप करणे सुरु केले. यामुळे भाजप शरद पवार यांची जवळीक होऊ शकली नाही, असाही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी सांगितले. (Latest Marathi News)
सीताराम केसरी अध्यक्ष असताना १४० खासदार हे शरद पवार यांच्यासोबत होते. यावेळी देवेगौडा हे पंतप्रधान झाले होते. केसरी यांच्या स्वभावाला कंटाळून देवेगौडा राजीनामा देणार होते. त्यानी शरद पवार याना पंतप्रधान होण्यासाठी निरोप पाठवला. देवेगौडा आणि १४० खासदार एकत्र असूनही पवार ऐनवेळी माघारी फिरले. हे मला अजूंपर्यंतही समजले नाही, असंही ते म्हणाले.
2014 मध्ये गडकरी यांच्यासोबत आमची बैठक झाली. यावेळी पवार यांनी ऐनवेळी भाजप सोबत जायचे नाही, हा निर्णय घेतला. उद्भव ठाकरे, सुभाष देसाई यांच्यासोबत बैठक फिस्कटली होती. शरद पवार हे बैठकीतून निघून गेले. पवार साहेब जाताना मला अजित पवार याना सांगून गेले तुम्ही काही निर्णय घ्या. त्या दिवशी अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधीसाठी भाजप सोबत गेले. असंही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
पटेल म्हणाले, ''माझे शरद पवार यांच्याशी वैयक्तिक वाद नाहीत. पण आमची राजकीय भूमिका शरद पवार यांच्या विरोधात आहे. आता आपण सगळे अजित दादा यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मी शरद पवार सोबत होतो, आता कायम स्वरूपी अजित पवार यांच्यासोबत आहे.
माझ्याकडे बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत भविष्यात मी देखील पुस्तक लिहिणार आहे. त्यावेळी मी माझी बाजू मांडेल. येथे दिलीप वळसे पाटील देखील बसले आहेत. त्यांच्या देखील पोटात खुप काही दडलं आहे. अनेक गोष्टी त्यांनी पोटात साठवल्या आहेत. आपल्या पक्षाचा प्रवास केवळ विधानसभा लोकसभापर्यंत नाही, पुढील २० ते २५ वर्ष अजित पवार यांच्या नेतृत्वखाली काम करायचं आहे हे देखिल पटेल यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.