मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी: या मार्गांवर परवा मेगा ब्लाॉक saam tv news
मुंबई/पुणे

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी: या मार्गांवर परवा मेगा ब्लाॉक

कुर्ला- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मध्य रेल्वे (Central Railway), मुंबई विभाग आपल्या उपनगरीय विभागांवर रविवार ८ ऑगस्ट २०२१ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक कार्यान्वित करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेकडून ही माहिती मिळाली आहे (Important news for Mumbaikars)

त्याचबरोबर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा मशिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, विद्याविहार या निर्धारित थांब्यांवर थांबणार नाहीत आणि पुढे डाउन धिम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.

घाटकोपर येथून सकाळी १०.४० ते सायंकाळी ३.५२ पर्यंत सुटणारी अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद या निर्धारित थांब्यांवर थांबणार नाहीत.

कुर्ला- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता जाणारी डाउन हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

तथापि, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला तसेच पनवेल आणि वाशी दरम्यान ब्लॉक कालावधीत विशेष सेवा चालविल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० या वेळेत मेन लाइन आणि ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mehndi Design: श्रावणात हातावर उठून दिसतील सोप्या अन् आकर्षक मेंहदी डिझाईन्स

Shocking : अंत्ययात्रेत अंधाधुंद गोळीबार; ७ जणांचा जागीच मृत्यू , घटनास्थळी लोकांची धावाधाव

Student Letter : "ताईंची बदली करू नका", शिक्षिकेसाठी तिसरीच्या विद्यार्थ्याचं शरद पवार यांना भावनिक पत्र

Mumbai: बोरीवलीच्या भाजी मंडईत तुफान राडा, कॅरेटने एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान बंद राहणार

SCROLL FOR NEXT