Important News For Mumbai Citizens Railway announces mega block in central harbour and Western line Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Mega Block: ऐन नवरात्रीत मुंबईकरांची होणार कोंडी; रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Mega Block on Sunday: रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Satish Daud

Mumbai Local Mega Block on Sunday

मुंबईल लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. रविवारी (२२ ऑक्टोबर) रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे.  (Latest Marathi News)

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे ते कल्याण पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर रविवारी मध्यरात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल. या ब्लॉकदरम्यान मुंबईकडे येणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील.

याशिवाय मुंबईतून (Mumbai Mega Block) बाहेर जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील मानखुर्द ते नेरुळ अप-डाऊन मार्गावरही रविवारी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

रविवारी सकाळी ११:१५ ते सायंकाळी ४:१५ पर्यंत हा मेगाब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी, वडाळा रोड येथून वाशी, सीबीडी बेलापूर पनवेलकरिता आणि सीएसएमटी येथून वांद्रे गोरेगावकरिता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द असणार आहे.

दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावरील गोरेगाव ते बोरिवली अप-डाऊन जलद मार्गावर देखील रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा गोरेगाव ते बोरिवली स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spices Storage Tips: मसाले फ्रिजमध्ये ठेवावेत की बाहेर? जास्त काळ फ्रेश आणि सुगंधी ठेवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या!

Horoscope : दिवाळीआधी या ४ राशींचं नशीब चमकणार? पैशाच्या अडचणी होतील दूर अन् नोकरी-व्यवसायात प्रगतीचे योग

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

diwali shopping in mumbai : मुंबईत दिवाळीची खरेदी करायचीये ? या ठिकाणांना नक्की भेट द्या

निवडणुकीत उमेदवाराने खोटी माहिती दिली? आता मतदार थेट दाखल करू शकतो तक्रार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT