AUS vs PAK: ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उटलफेर; पाकिस्तान टॉप ४ मधून बाहेर

ICC World Cup 2023 Points Table: या पराभवामुळे पाकिस्तानचं गुणतालिकेत मोठं नुकसान झालं असून ऑस्ट्रेलियाला जबरदस्त फायदा झाला आहे.
ICC World Cup 2023 Points Table pakistan out of top 4 after losing to australia
ICC World Cup 2023 Points Table pakistan out of top 4 after losing to australia Saam TV
Published On

ICC World Cup 2023 Points Table

सलामीवर डेव्हिड वॉर्नर-मिचेल मार्शची शतकी खेळी आणि अॅडम झंपाने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर ६२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. यंदाच्या विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय, तर पाकिस्तानला दुसरा पराभव ठरला. या पराभवामुळे पाकिस्तानचं गुणतालिकेत मोठं नुकसान झालं असून ऑस्ट्रेलियाला जबरदस्त फायदा झाला आहे. (Latest sports updates)

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमकडून मोठी चूक झाली. त्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचे सलामीवर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. वॉर्नरनं १६३ धावा, तर मिचेल मार्शनं १२१ धावा कुटल्या.

ICC World Cup 2023 Points Table pakistan out of top 4 after losing to australia
Cricket Anthem: Poonawalla fincorpचं क्रिकेटवरील खास अ‍ॅन्थम रीलीज; अनोखं गाणं पाहून भारतीय क्रिकेटचा इतिहास आठवेल

पाकिस्तानची चांगली सुरुवात

दोघांनी मिळून पहिल्या विकेट्साठी २५९ धावांची सलामी दिली. शेवटच्या काही षटकांमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पुनरागमन केलं आणि ऑस्ट्रेलियाचा डाव ३६८ धावांवर रोखला. दरम्यान, या धावसंखेचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात देखील चांगली झाली. सलामीवर इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफिकने पहिल्या विकेट्साठी शतकी भागीदारी केली.

ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या

मात्र, दोघेही एकापाठोपाठ एक बाद झाले. ठराविक अंतराने विकेट्स गमावल्यामुले पाकिस्तानचा डाव ३०४ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झंपाने फिरकीचा भेदक मारा केला. त्याने पाकिस्तानच्या ४ तगड्या खेळाडूंना माघारी पाठवलं. दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून ६२ धावांनी पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या संघाची गुणतालिकेत घसरण झाली आहे.

पाकिस्तानचा संघ टॉप ४ मधून बाहेर

या सामन्याआधी पाकिस्तानचा संघ चौथ्या क्रमांकावर होता. मात्र, आता या स्थानावर ऑस्ट्रेलियाने कब्जा केला आहे. त्यामुळे पाकिस्तान पाचव्या स्थानावर फेकला गेलाय. पाकिस्तान संघाने ४ सामन्यात दोन विजय मिळवले आहेत. तर दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने देखील दोन सामन्यात विजय मिळवला आहे.

गुणतालिकेत न्यूझीलंड अव्वल स्थानावर

मात्र, नेटरनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला असल्याने ते चौथ्या क्रमांकावर पोहचले आहेत. दोन पराभव आणि दोन विजय झाले आहेत. गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ पहिल्या आणि भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्या स्थानावर कायम आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यामध्ये रविवारी सामना होणार आहे.

पहिल्या स्थानावर कोण कब्जा करणार?

या सामन्यात जो संघ बाजी मारेल, तो गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज करेल. याशिवाय सेमीफायनलच्या आणखी जवळ जाईल. दुसरीकडे श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत एकमद तळाशी आहे. श्रीलंकेला आतापर्यंत विजयाचे खातेही उघडता आले नाही. त्यांना सलग तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंड, बांगलादेश, नेदरलँड आणि अफगाणिस्तान या संघांनी प्रत्येकी एक एक विजय मिळवला आहे.

ICC World Cup 2023 Points Table pakistan out of top 4 after losing to australia
Horoscope 21 October: शुक्राचा कन्या राशीत प्रवेश होणार, या राशींचं भाग्य बदलणार; वाचा आजचे राशीभविष्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com