एपीएमसी मधील व्यापाऱ्यांनाही तातडीने नुकसान भरपाई द्या- जिल्हा कार्याध्यक्ष
एपीएमसी मधील व्यापाऱ्यांनाही तातडीने नुकसान भरपाई द्या- जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

एपीएमसी मधील व्यापाऱ्यांनाही तातडीने नुकसान भरपाई द्या- जिल्हा कार्याध्यक्ष

प्रदीप भणगे

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याणमध्ये Kalyan २१ व २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फुल मार्केट हे सखोल भागात असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साचले होते. त्यानंतर हाताश झालेल्या फुल व्यापाऱ्यांनी २७ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण डोंबिवली Dombivali जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. वंडारशेठ पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर लगेचच २८ जुलै रोजी सकाळी वंडारशेठ पाटील कल्याण एपीएमसी मधील फुल मार्केट मध्ये जाऊन पाहणी केली.

त्याप्रसंगी व्यापाऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या व कचराही फार मोठ्या प्रमाणामध्ये साठला असल्यामुळे आधीच कोविड-१९ चे संक्रमण चालू असताना या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरण्याची भीती व्यापाऱ्यांनी निर्माण केली. त्यानंतर फूल व्यापाऱ्यांनी कल्याण एपीएमसीचे सचिव व सभापती यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले व कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सूचना वंडारशेठ पाटील यांनी सभापती व सचिव यांना दिल्या.

हे देखील पहा-


पाहणी दौरा करून व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासह तहसिलदार दीपक आकडे यांना निवेदन देऊन झालेल्या नुकसान भरपाई मध्ये व्यापाऱ्यांचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे, गल्ले, बिल पुस्तके, टेबल-खुर्च्या वाहून गेल्यामुळे सर्व व्यापार यांचे फार मोठे नुकसान झाले.

त्यामुळे तातडीने पंचनामे करून व्यापाऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी निवेदनातून वंडारशेठ पाटील यांनी केली. त्यावर तहसिलदार दीपक आकडे यांनी मंडळ अधिकारी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले.याप्रसंगी व्यापारी मंडळाचे रामदास यादव, भाऊ नरवडे, बाळू कदम, भरत मेमाने, अतुल धुमाळ, सतीश फुलोरे, कैलास फापाळे, गुड्डू राजभर, राष्ट्रवादी युवकचे प्रकाश हरड आदी पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha | उमेदवारीचा गोंधळ, वैशाली दरेकरांची पहिली प्रतिक्रिया!

Money Tips: पैसे उजव्या हाताने का देतात? कारण वाचा

Mumbai Metro: मतदारांना विशेष सवलत; मतदानाच्या दिवशी मेट्रो तिकिटावर मिळणार १० टक्के सूट

Sanjay Nirupam : संजय निरुपम २० वर्षांनंतर पुन्हा शिवसनेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

PM Modi: पंतप्रधान मोदी १४ मे रोजी भरणार उमेदवारी अर्ज, १३ तारखेला वाराणसीत करणार मोठा रोड शो

SCROLL FOR NEXT