अवघ्या तासाभराच्या पावसानं कल्याण झालं जलमय, विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून काढावी लागली वाट
Kalyan Rain Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Rain : अवघ्या तासाभराच्या पावसानं कल्याण झालं जलमय, विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून काढावी लागली वाट

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण प्रतिनिधी

कल्याण डोंबिवलीत सकाळपासून रिमझिम पाऊस पडतोय. मात्र सायंकाळी या पावसाने जोर पकडला. मात्र अवघा एक तास जोरदार बरसलेल्या या पावसामुळे कल्याण शहरातील रस्ते जलमय व्हायला सुरुवात झाली आहे.

कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक,तसेच रामबाग आणि इतर भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. या पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचून राहिले आहे. सततच्या पावसामुळे कल्याण शहरातील रस्ते हे जलमय होत असल्याने पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिका प्रशासनाने कागदी घोडे न नाचवता ठोस उपयोजना करावी, अशी मागणी केली जातेय.

विद्यार्थ्यांचे मोठे हाल

दरम्यान, कल्याण तालुक्यातील म्हारळ गावात पावसामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले आहे. सायंकाळी शाळेतून सुटलेली विद्यार्थ्यांना अक्षरशः गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली. म्हारळ गावामध्ये रस्त्यांची कामे अर्धवट झालेली आहेत त्यातच नाले देखील अरुंद असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पावसाचे पाणी म्हारळ गावामध्ये साचते.

या साचलेल्या पाण्यातून इथल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते. या भागांमध्ये तासापासून जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे. या साचलेल्या पाण्यातून वाट काढत असताना एखादा विद्यार्थी घसरून दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवालही स्थानिकांकडून विचारला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajaj CNG Bike: जगातील पहिली CNG बाईक Freedom आज होणार लॉन्च, जबरदास्त फीचर्ससह किती आहे किंमत?

Solapur Breaking : शेतकऱ्यावर कोसळलं आभाळ, महावितरणच्या विद्युत तारेने केला घात; ओढ्यात विजेचा धक्का लागून 24 म्हशींचा मृत्यू

Aadhaar Card: आता आधार कार्ड बनवायला लागू शकतात 6 महिने, UIDAIने केले 3 मोठे बदल

Shukra Rashi Parivartan : ४ दिवसांत ३ राशींचे नशीब उजळणार; यशाचा मार्ग गवसणार, वाचा

Pune Tourist Places: पुण्यात पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागू! कुठल्या ठिकाणी जमावबंदी आणि काय आहेत नियम? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT