IMD Alert Maharashtra Heavy Rain Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Rain Alert: राज्यासाठी पुढील २४ तास धोक्याचे; 'आषाढी'च्या दिवशी या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

Satish Daud

IMD Alert Maharashtra Heavy Rain: यंदा राज्यात मान्सूनचं आगमन उशीराने झालं असलं, तरी आता मात्र पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबई, पुण्यासह कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला असून नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. अशातच येत्या २४ तासांत राज्यात पावसाचा जोर आणखीच वाढणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, उद्या म्हणजेच २९ जून रोजी आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) दिवशी राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

कोणकोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

गुरूवारी राज्यातील रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दिला आहे, त्यामुळे या भागात उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. दुसरीकडे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाला सुरूवात

दरम्यान, मुंबईसह उपनगरात सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. बुधवारी सकाळपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे परिसरात पाणी साचलं होतं. तर ठाण्यातही मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचलं होतं.

मुंबई लोकलला मुसळधार पावसाचा फटका

या पावसाचा फटका मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेला (Mumbai Local Train) देखील बसला. मुसळधार पावसाने लोकल रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आता पुढील २४ तासांत पावसाचा जोर आणखीच वाढणार असून काम असेल, तरच घराबाहेर पडा, असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT