Maharashtra Weather Update Saam Tv
मुंबई/पुणे

Rain Alert : महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट, ऐन थंडीत 'या' जिल्ह्यांत पडणार पाऊस, वाचा हवामान अपडेट

Maharashtra Weather Update : उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची लाट कायम असून धुळे येथे किमान तापमान ६ अंशांवर पोहोचले आहे. पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Alisha Khedekar

  • उत्तर महाराष्ट्र व विदर्भात थंडीची लाट कायम आहे

  • धुळे येथे किमान तापमान ६ अंशांवर पोहोचले

  • निफाड, मालेगाव, गोंदिया येथेही तापमान १० अंशांखाली

  • पुढील दोन दिवस ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता

राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होत आहे. असे असले तरी उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात थंडीचा कडाका कायम आहे. धुळे आणि निफाड येथे थंडीच्या लाटेसदृश स्थिती आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्याच्या किमान तापमानातील चढ-उतार होण्याची शक्यता कायम असून, गारठा काहीसा कमी होणार असल्याचं सांगितलं. शिवाय पुढील दोन दिवस ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

हवामान खात्यानुसार, किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास, तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीची लाट, तर तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचे समजले जाते. काल धुळे येथे नीचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

निफाड येथे ७.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तसेच मालेगाव, गोंदिया आणि भंडारा येथे १० अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या वर गेला आहे. आज काहीसे ढगाळ वातावरण असणार आहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळणार आहेत.

तसेच किमान तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होणार असून गारठा काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. १३ जानेवारी आणि १४ जानेवारी रोजी म्हणजेच आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sayaji Shinde Birthday : साऊथमध्ये डॅशिंग व्हिलन, मराठीत हुकमी एक्का; कोट्यवधींचे मालक असूनही सयाजी शिंदेंचे पाय जमिनीवरच

NHAI Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय सरकारी नोकरी; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती; पगार १.७७ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : नालासोप-यात मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी नेताना १० लाख ९ हजार रोख रक्कम पकडली

Alepak Recipe : हिवाळ्यासाठी खास आयुर्वेदिक आलेपाक कसा बनवावा? जाणून घ्या रेसिपी

Face Yoga Poses: डबल चिनमुळे चेहरा मोठा दिसतोय? मग घरीच करा रोज हे 5 फेस योगा प्रकार

SCROLL FOR NEXT