IMD Alert Yandex
मुंबई/पुणे

IMD Alert: मुंबईकरांनो सावधान! येत्या ३६ तासांत समुद्र बेभान होणार; उंच लाटा उसळणार, कारण काय?

Mumbai News: येत्या ३६ तासांच्या कालावधीत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता भारतीय हवामानशास्र विभाग (IMD) आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीसने (INCOIS) वर्तवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

येत्या ३६ तासांच्या कालावधीत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता भारतीय हवामानशास्र विभाग (IMD) आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीसने (INCOIS) वर्तवली आहे.त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे तसेच संबंधित असणाऱ्या यंत्रणांना सहकार्य करावे असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

भारतीय हवामानशास्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शनिवार ४ मे रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून ते रविवार दिनांक ५ मे २०२४ रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत. या ३६ तासांच्या कालावधीत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

कोणत्या भागात परिणाम दिसून येईल...

मिळालेला इशारा लक्षात घेता समुद्र किनारपट्टीच्या आसपासच्या परिसरात तसेच सखल भागांमध्ये या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. साधारणपणे समुद्रात भरतीच्या कालावधीत लाटांच्या उंचीत सरासरी ०.५ ते १.५ मीटर इतकी वाढ होण्याची शक्यता आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आवाहन...

अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा हा इशारा लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने या गोष्टीकडे गंभीररित्या लक्ष दिले आहे, याच पाश्वभूमिवर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी महानगरपालिकेच्या सर्व सहायक आयुक्त यांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याचे आवाहनही केले आहे. उन्हाळी सुटीच्या निमित्ताने समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची संख्या जास्त दिसून येते. त्यामुळे अतिरिक्त खबरदारी म्हणून महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक यांच्या मदतीने नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच समुद्राशी वारंवार संपर्क येणाऱ्या किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांनाही किनाऱ्यावर सुरक्षित अंतरावर बोटी ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जेणेकरून उसळणाऱ्या लाटांमुळे एकमेकांना धडकून बोटींचे नुकसान होणार नाही.

या सर्व परिस्थितीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस तसेच इतर यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. या सांगण्यात आलेल्या कालावधीत घाबरुन जाता पर्यटक आणि किनारपट्टीवर वास्तव्यास असलेल्या सर्व नागरिकांनी सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election 2026: मुंबईत मनसेला भगदाड, भाजपनंतर शिवसेनेकडून धक्का, शेकडो पदाधिकारी शिंदेसेनेत

Destination Wedding Places : डेस्टिनेशन वेडिंग प्लान करताय? ही आहेत भन्नाट लोकेशन्स

Film Director Death: प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Irrfan Khan Birth Anniversary : इरफान खानने वाचवला होता जीव; आज 'तो' आहे IPS ऑफिसर, नेमका किस्सा काय?

Hairstyle Ideas: मकर संक्रांतीला काळ्या साडीवर खुलून दिसतील 'या' 5 हेअरस्टाईल्स; पारंपारिक लूकला मिळेल मॉडर्न टच

SCROLL FOR NEXT