Mumbai Market
Mumbai MarketSaam TV

Mumbai Market : मुंबईतील सर्वात स्वस्त कपड्यांचं मार्केट; स्टार्टींग रेंज फक्त २५० रुपये

Mumbai Street Shopping Market :कपड्यांपासून विविध वस्तू अगदी स्वस्त किंमतीत मिळतात. त्यामुळे तुम्ही येथे शॉपींगसाठी येऊ शकता. या मार्केटमध्ये ड्रायफ्रूट्स आणि ग्रोसरीच्या वस्तू देखील मिळतात.

सध्या महागाईचा चांगलाच भडका उडाला आहे. अशात प्रत्येक व्यक्ती खिशाला परवडतील आणि स्वस्त असतीश अशा वस्तू शोधत असतो. त्यामुळे आज मुंबई आणि उपनगरातील काही अशा मार्केटबद्दल महिती जाणून घेणार आहोत जिथे फार स्वस्त दरात कपडे मिळतात.

Mumbai Market
Stock Market Today : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स-निफ्टी, मिडकॅप इंडेक्स ४९ हजार पार

क्रॉफर्ड मार्केट

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट फार फेमस आहे. येथे कपड्यांपासून विविध वस्तू अगदी स्वस्त किंमतीत मिळतात. त्यामुळे तुम्ही येथे शॉपींगसाठी येऊ शकता. या मार्केटमध्ये ड्रायफ्रूट्स आणि ग्रोसरीच्या वस्तू देखील मिळतात. तसेच कपडे देखील २५० रुपयांपासून स्टार्ट होतात.

ठाणे

ठाण्यामध्ये गावदेवी मार्केट फार फेमस आहे. या मार्केटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे कपडे मिळतील. हेवी वर्क असलेले लेहंगे, रोजच्या वापरातील कुरते, जिन्स आणि टॉप अगदी स्वसत दरात येथे मिळतात. या मार्केटमध्ये एक पाणीपुरी स्टॉल देखील आहे. खरेदी करून दमल्यावर तुम्ही येथे तुमच्या जीभेचे चोचले पुरवू शकता.

उल्हासनगर

उल्हासनगरमध्ये देखील गजानन मार्केट फार प्रसिद्ध आहे. येथे सिंधी भाषिक व्यक्ती जास्त राहत असल्याने येथील फॅशन देखील तशाच पद्धतीची असल्याचं पाहायला मिळतं. या मार्केटमध्ये तुम्हाला विविध पार्टीवेअर कपडे स्वस्त दरात मिळतात. तसेच फर्निचर आणि घरातील प्लास्टीक, स्टील अशा विविध वस्तू येथे अगदीच स्वस्त दरात मिळतात. याचं महत्वाचं कारण म्हणजे मार्केटमध्ये येणाऱ्या सर्व वस्तू उल्हासनगरमध्येच तयार होतात.

फॅशन स्ट्रीट

मुंबईतील फॅशन स्ट्रीटला तुम्ही आयुष्यात एकदा तरी शॉपींग केली पाहीजे. येथे कपड्यांच्या किंमती अव्वाच्या सव्वा सांगितल्या जातात. मात्र बार्गेनींग करणाऱ्या व्यक्तींना येथे अगदी स्वस्त दरात कपडे उपलब्ध आहेत. श्युज, स्कार्फ, यांच्यासह डेली युज आणि पार्टीवेअर असे सर्व प्रकारचे कपडे फॅशन स्ट्रीटला मिळतात.

Mumbai Market
Mumbai Crime: कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार; पत्नीने बनवला व्हिडिओ अन्.. मुंबईतील संतापजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com