Mumbai High Court Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai High Court : ३ अपत्ये असणाऱ्यांना हाउसिंग सोसायटीची निवडणूक लढता येणार नाही; हायकोर्टाचा निर्वाळा

Vishal Gangurde

मुंबई : हाउसिंग सोसायटीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. ३ अपत्ये असणाऱ्या व्यक्तीस कोणतीही निवडणूक लढवता येत नाही. या व्यक्तीने माहिती लपवून ठेवत जिंकली तरी, सिद्ध झाल्यास या लोकप्रतिनिधीला अपात्र करण्याचा नियम आहे. हाच नियम गृहनिर्माण निवडणुकीलाही लागू होतो, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

मुंबई उच्च नायालयाच्या न्या. अविनाश घराटे यांच्या एकल पीठाने हा महत्वाचा निर्वाळा दिलाय. तीन अपत्ये असणाऱ्या एका गृहनिर्माण सोसायटीमधील अध्यक्षाला अपात्र ठरवत उपनिंबधकाचा आदेश कायम ठेवला.

या प्रकरणात महाराष्ट्र को ऑप. हौ. सोसायटी कायद्यात दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या पदाधिकाऱ्याचे पद रद्द करण्याची तरतूद नसल्याचा दावा सिंग यांना यांनी केला होता. मात्र, अपनिंबधकाचे आदेश योग्य असल्याचा युक्तिवाद अॅड. उदय वारुंजीकर यांनी केला.

काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईतील कांदिवली चारकोपच्या एकता नगर गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष पवनकुमार नंदकिशोर सिंग यांच्या अध्यक्षपदाला दीपक तेजल आणि रामाचल यादव यांनी आव्हान दिले होते. पवनकुमार नंदकिशोर सिंग यांना तीन अपत्ये आहेत. त्यांना अपात्र करण्याची मागणी उपनिबंधकाकडे केली होती. त्यानंतर त्यांना सिंग यांना अपात्र केले होते. त्यानंतर सिंग यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.

दरम्यान, तीनपैकी एक माझे नसल्याचा दावा सिंग यांनी केला होता. तो मुलगा शिक्षण घेण्यासाठी सोबत राहतो. त्यानंतर त्यांना मुलाचा जन्म दाखला सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर सिंग त्याचा जन्माचा दाखला सादर करू शकले नाही. रेशन कार्डवरही त्याचे मुलाचे नाव आहे. त्यामुळे तो मुलगा त्यांचाच असून त्यांना तीन अपत्ये आहेत, असे म्हणत उपनिंबधकांच्या आदेशात दोष नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: विधानसभेच्या मोर्चेबांधणीत मनसेची आघाडी! दसऱ्यानंतर राज ठाकरेंचा मेळावा; उमेदवारांची घोषणा करणार

Marathi News Live Updates : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून २ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

Raigad Crime : रायगड हादरलं! १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल होताच पोलीस पाटील फरार

Viral News: दिल्ली मेट्रोत चाललंय तरी काय? अश्लील डान्सनंतर आता रंगला पत्त्यांच्या डाव; VIDEO पाहून अनेकांचा संताप

Assembly Election 2024: राजकीय सभांचा डबल धमाका! PM मोदींची ठाण्यात तर राहुल गांधींची कोल्हापुरात 'तोफ' धडाडणार; वाचा सविस्तर..

SCROLL FOR NEXT