आपण भाजपसोबत गेलो तर बिघडलं कुठं? आपली कामे होत आहेत. जे सर्वजण आपल्यासोबत आले, ते सगळे खूश आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. आज युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेबसाईटचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. त्यावेळी अजित पवार असं म्हणाले आहेत.
अजित पवार म्हणालेकी, ''छगन भुजबळ पहिल्या फळीचे नेते होते, आम्ही दुसऱ्या फळीचे नेते होतो. पक्षाची पहिली सभा अतिशय भव्य दिव्य अशी पार पडली. आम्ही अनेकांनी सगळी पदे भोगली, पण मुंबईत पक्ष ज्या पद्धतीने वाढायला हवा होता तो वाढला नाही. आमचं लक्ष ग्रामीण भागात होतं. गृहखाते आपल्याकडे होतं पण आम्ही कमी पडलो. पण आता समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. बहुजनांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे.'' (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ते म्हणाले, पूर्वी शिवसेना कुठे होती, फक्त मुंबापुरी पूरती होती. मुंबईतून कोकणात वाढली मग महाराष्ट्रात वाढली. त्यांची जशी जिद्द तशी आपली देखील आहे. (Latest Marathi News)
धारावीच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, ''धारावी बाबत बोलतात कोणत्या तरी एका बिल्डरचं भलं होणार आहे, असं म्हणतात. तर असं काही असेल तर आपण त्याबाबत आपण अभ्यास करू. मोठी टेंडर निघतात तेव्हा विरोधकांचा एकच आरोप असतो की, यात मोठा घोटाळा आहे. कारण नसताना सामाजिक तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करतात.''
अजित पवार पुढे म्हणाले, विधानसभा लोकसभा आणि महानगरपलिका निवडणुकीत आपण काम करणार आहोत. आपल्या आपल्या भागात निवडणुन येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे उभे रहायला हवं. वंचीत बहुजन यांच्या करिता आपण काय करत आहोत, ते आपल्याला दाखवायचं आहे. तीन पक्षांची विचारधारा वेगळी असली तरी जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता मोठी आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.