School Closed: देशभरात थंडीचा कहर, या राज्याने 14 जानेवारीपर्यंत शाळांना सुटी केली जाहीर

Punjab School News: कडाक्याची थंडी आणि वाढते धुके पाहता पंजाब सरकारने राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
School Closed
School ClosedSaam TV
Published On

Punjab School News:

कडाक्याची थंडी आणि वाढते धुके पाहता पंजाब सरकारने राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्वीट करून ही घोषणा केली आहे. मान यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, पंजाबमधील थंडीची लाट लक्षात घेता 8 जानेवारी ते 14 जानेवारी 2024 पर्यंत सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये 10 वी पर्यंतच्या सुट्या असतील.

याआधी पंजाबमधील थंडीचे वातावरण पाहता शाळांच्या वेळा सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र शाळेंना सुट्या जाहीर करण्यात आल्या नव्हत्या.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

School Closed
Sansad Ratna Award: खासदार श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर, १७ व्या लोकसभेतील कामगिरीचा गौरव

आता मुख्यमंत्री मान यांनी हायस्कूलपर्यंतच्या मुलांना १४ जानेवारीपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. इयत्ता ११वी आणि १२वीचे नियमित वर्ग सुरु राहतील, ज्याची वेळ सकाळी १० ते दुपारी ३ अशी असेल. हा आदेश सर्व सरकारी, खाजगी आणि अनुदानित शाळांना लागू असेल.  (Latest Marathi News)

थंडीचा कहर वाढणार

येत्या काही दिवसांत थंडीची लाट आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान खात्याने पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये थंडीची लाट आणि दाट धुक्याचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

School Closed
Congress Politics: लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू; काँग्रेसने राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांवर दिली मोठी जबाबदारी

पंजाबमध्ये शनिवारी सुमारे दोन तास सूर्यप्रकाशामुळे कमाल तापमानात १.१ अंशांनी वाढ झाली. जे सामान्यपेक्षा ७.४ अंशांनी कमी राहिले. अमृतसर येथे ९.२ अंश तापमानासह सर्वात थंड होते. लुधियानामध्ये तापमान १३.० अंश होते, जे सामान्यपेक्षा ४.१ अंश कमी होते, तर पटियालामध्ये तापमान १३.३ अंश होते, जे सामान्यपेक्षा ४.४ अंश कमी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com