Congress Politics: लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू; काँग्रेसने राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांवर दिली मोठी जबाबदारी

Latest Lok Sabha elections 2024 news: काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४८ मतदारसंघासाठी मेगा प्लान आखला आहे. काँग्रेसने राज्यातील ४८ मतदारसंघात समन्वयक नियुक्त केले आहेत.
Loksabha Election
Loksabha ElectionSaam tv
Published On

सुनील काळे, मुंबई

Congress loksabha election :

देशातील सर्व राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसही कामाला लागलीआहे. काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४८ मतदारसंघासाठी मेगा प्लान आखला आहे. काँग्रेसने राज्यातील ४८ मतदारसंघात समन्वयक नियुक्त केले आहेत. काँग्रेसकडून महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांवर मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कालच समन्वयक जाहीर होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज काँग्रेसने महाराष्ट्रातील सर्व लोकसभेच्या मतदारसंघात समन्वयक जाहीर केले आहेत.

काँग्रेसकडून राज्यातलील सर्व ४८ मतदारसंघासाठी समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याकडे एका लोकसभा मतदारसंघाची‌ जबाबदारी देण्यात आली आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Loksabha Election
Sansad Ratna Award: खासदार श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर, १७ व्या लोकसभेतील कामगिरीचा गौरव

काँग्रेस अध्यक्ष काय म्हणाले होते?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी समन्वयक नियुक्त करण्यात येईल असं सांगितलं होतं. 'काँग्रेस पक्षाने सर्व ५४५ लोकसभा मतदारसंघात काम करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाने सर्व मतदारसंघात समन्वयक नियुक्त केले आहेत. परंतु कोणत्या मतदारसंघात कोणता पक्ष निवडणूक लढेल, कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढणार, याबाबत इंडिया आघाडीचे सर्व नेते एकत्र चर्चा करून निर्णय घेतील, अशी माहिती दिली होती. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Loksabha Election
Ravindra Dhangekar: 'हत्या, कोयता गँगचा विषय गंभीर, भाजपकडून गुन्हेगारांना राजकीय आश्रय..' रविंद्र धंगेकरांचे गंभीर आरोप

काँग्रेसची नव्या प्रभारींच्या उपस्थितीत बैठक होणार

काँग्रेसच्या नव्या प्रभारींच्या उपस्थितीत बैठक ११ जानेवारीला होणार आहे. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत ११ जानेवारीला बैठक होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची ११ तारखेला टिळक भवनात बैठक होणार आहे. आगामी निवडणूक, जागावाटपासह पक्षाच्या संघटनेबद्दल चर्चा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com