PMC Elections: Prashant Jagtap Saam Tv
मुंबई/पुणे

PMC Elections: "आघाडी झाली तर आमचे १३५ ते १३८ नगरसेवक येतील" - प्रशांत जगताप

PMC Elections: प्रशांत जगताप म्हणाले की, प्रभाग रचना चांगली झाली आहे. आम्ही १२२ जागा जिंकू. २०२१ ची जनगणना झाली तर समाविष्ट गावात जास्त प्रतिनिधी मिळू शकले असते.

साम टिव्ही

ब्रिजमोहन पाटील, पुणे

पुणे: पुणे महानगर पालिकेच्या (Pune Municipal Corporation) निवडणुकीत (Elections) आघाडी झाली तर आमच्या १३५ ते १३८ नगरसेवक (Corporators) निवडून येतील असा दावा राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष तथा माजी महापौर प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी केला आहे. तसेच आघाडी झाली तर ११० जागांच्या खाली राष्ट्रवादी (NCP) येणार नाही असंही ते म्हणाले आहेत. ("If there is an alliance, 135 to 138 of our corporators will elect to Pune Municipal Corporation" said Prashant Jagtap)

हे देखील पहा -

प्रशांत जगताप म्हणाले की, प्रभाग रचना चांगली झाली आहे. आम्ही १२२ जागा जिंकू. २०२१ ची जनगणना झाली तर समाविष्ट गावात जास्त प्रतिनिधी मिळू शकले असते. ही प्रभाग रचना आरशासारखी स्वच्छ आहे. राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवावी अशी मतं आहे, यावर पक्षनेते घेतील, याबाबत सर्वांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणूकीत आघाडीबाबत अजितदादा, पवार साहेब, सुप्रिया ताई जो निर्णय देतील मान्य आहे, पण स्वबळावर लढवावी अंस जगताप म्हणाले.

पुढे ते म्हणाले की पूर्वी आघाडीची चर्चा झाली, पण ती चर्चा पुढे गेली नाही. पुढील तीन दिवसांत चर्चा करणार आहे, आघाडी झाली तर आघाडीचे १३५ ते १३८ नगरसेवक येतील. भाजपसाठी ही स्थिती पूरक नाही, अनेक नगरसेवक पक्ष सोडतील. १२२ पैकी १६ आयाराम असतील. भाजपने त्यांचे जुने सहकारी सांभाळावेत असा टोला त्यांनी भाजपला लगावला. त्याचप्रमाणे माझ्या उमेदवारीचा निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील, यावेळी अध्यक्ष म्हणून काम करायचे आहे असंही जगताप म्हणाले आहेत. १०३ नगरसेवक हे हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी येथील आहेत, तेथील नगरसेवक पक्ष प्रवेश करत आहेत. आघाडी झाली तर ११० जागांच्या खाली राष्ट्रवादी येणार नाही असा दावाही त्यांनी केला आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुका यावर्षी फेब्रुवारीमध्ये होणार आहेत. त्याची तयारी सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर गेल्या २१ वर्षांपासून पक्षसंघटनेत कार्यरत असलेल्या जगताप यांची शहराध्यक्षपदी निवड झाली. जगताप २०१६ - १७ मध्ये पुण्याचे महापौर होते. त्यांच्या कारकिर्दीत स्मार्ट सिटी आणि मेट्रो प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झाले होते. या दोन्ही कार्यक्रमांच्या वेळी राज्यात भाजप- शिवसेना युतीची सत्ता होती. तर महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यावेळी दोन्ही प्रकल्पांवरून वादंग झाला होता.

महापौर म्हणून जगताप यांचा त्यावेळी भाजपबरोबर संघर्ष झाला होता. जगताप यांची नगरसेवकपदाची तिसरी टर्म असून २००७, २०१२ आणि २०१७ मध्ये ते निवडून आले आहेत. २०१२ मध्ये पीएमपीच्या संचालकपदाची त्यांना संधी मिळाली होती.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT