केंद्राचं बजेट हे घोर निराशा करणारं; अर्थसंकल्पावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया

आकड्याचा खेळ करत केंद्र सरकारने कसे चांगले काम केले हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
Sunil Tatkare
Sunil TatkareSaam Tv
Published On

राजेश भोस्तेकर

रायगड - केंद्राच बजेट हे घोर निराशा करणारे आहे. आकड्याचा खेळ करीत स्वतःच कर्तृत्व दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका सुनील तटकरे यांनी केली आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून तीन वर्षात राज्यात एक इंचही काम नाही अशी प्रतिक्रिया अर्थसंकल्पाबाबत खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली आहे.

हे देखील पाह -

केंद्र आज अर्थसंकल्प जाहीर करणार असल्याने सर्वसामान्य जनतेच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र हा अर्थसंकल्प घोर निराशा करणारा ठरला आहे. आकड्याचा खेळ करत केंद्र सरकारने कसे चांगले काम केले हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. कुठलीही कर सवलत दिलेली नाही. नवीन योजना जाहीर करण्याचा कार्यक्रम केला आहे.

Sunil Tatkare
जुन्या घोषणांना मूठमाती; नव्या स्वप्नांचे गाजर!अर्थसंकल्पावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

जाहीर केलेल्या योजनांबाबद फलश्रुती दाखविण्याचा प्रयत्न केला असला तरी पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत तीन वर्षात एक इंचही रस्त्याचे काम राज्यात झालेले नाही आहे. ठोस देशाला प्रगती पथावर नेण्याबाबत कोणताही संकल्प अर्थसंकल्पात दिसत नाही. शेतकऱ्यांना आधारभूत किंमत आधीही दिलेली आहे त्यात नवीन काहीच दिलेले नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प घोर निराशा करणारा आहे. अशी प्रतिक्रिया रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com