If temples ask for permission to loudspeaker, will the government give it? Anand Dave's question Saam Tv
मुंबई/पुणे

मंदिरांनीही भोंग्याची परवानगी मागितली तर सरकार देणार का? आनंद दवेंचा सवाल

Anand Dave On Loudspeakers: रोज सकाळी उठून भोंग्यांची वेळ,आवाज मोजण्याची यंत्रणा शासनाकडे आहे का? त्याच नियमानुसार डेसिबल कोण, कसे, आणि केव्हा मोजणार?

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: मशीदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं आहे. भोंग्याबाबत सर्व मार्गदर्शक सूचनांचे कटाक्षाने पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता भोंगे (Loudspeaker) लावण्याअगोदर स्थानिक प्रशासकीय परवानगी घेणे बंधनकारक आहे. नाशिकमध्ये ३ मेंपर्यंत मशीदच नव्हे, तर सर्व धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे. याबाबत ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) मंदिरांनीही भोंग्याची परवानगी मागितली तर सरकार देणार का? असा सवाल उपस्थित करत केला आहे. (If temples ask for permission to loudspeaker, will the government give it? Anand Dave's question)

हे देखील पहा -

आनंदं दवे म्हणाले की, 3 में पर्यंत सर्वच प्रार्थनास्थळांना परवानगी देण्याचा शासन विचार करत आहे. यामुळे परवानगी मिळाल्यावर वाजवा हा नियम होणार असं दिसत आहे. हा नियमच चुकीचा आहे. रोज सकाळी उठून भोंग्यांची वेळ,आवाज मोजण्याची यंत्रणा शासनाकडे आहे का? त्याच नियमानुसार डेसिबल कोण, कसे, आणि केव्हा मोजणार? त्याचवेळेस जर मंदिरांनीसुद्धा अशीच परवानगी मागितली तर सरकार देणार का? त्या पेक्षा पूजा आणि धर्म त्या भिंतींच्या आत ठेवा. कोणत्याही परिस्थितीत भोंगे लावण्याची परवानगी कोणालाच नाही असा सरळ नियम करावा अशी मागणी त्यांनी केली.

तसेच मशिदीशेजारी 100 मीटर पर्यंत हनुमान पूजा करायची नाही, हा तर तुघलकी निर्णय आहे, असा निर्णय तर मोघेलाईत पण नव्हता अशी बोचरी टीका आनंक दवे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील पुण्येश्वर मंदिरात आरती करणार कधी? ते मंदिर तर मशीदला (दर्गा) ला चिकटून आहे. असं म्हणत मुस्लिम समाजाला राजकारणासाठी वेठीस धरु देणार नाही असंही आंनंद दवे म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

SCROLL FOR NEXT