Dhananjay Munde/Karuna Sharma Saam TV
मुंबई/पुणे

मी एक सीडी लावली तर महाराष्ट्र हादरेल; करुणा शर्मांच्या वक्तव्याने खळबळ

मी धनंजय मुंडेंविरोधात दिलेल्या तक्रारीबाबत कुठलीच कारवाई होत नाही. राष्ट्रवादी धनंजय मुंडेंना पाठीशी घालत आहे.

सुरज सावंत

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आज पत्नी करुणा शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले. माझ्या आईने मुंडेंच्या दबावामुळेच आत्महत्या केल्याचा आरोप करतच, मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल असं वक्तव्य शर्मा (Karuna Sharma) यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. एवढचं नव्हे तर विरोधीपक्षनेते याबाबत आवाज उठवत नाहीत कारण ते एकमेकांना मिळाले असल्याचा आरोपही शर्मा यांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या, 'मी धनंजय मुंडें (Dhananjay Munde) विरोधात दिलेल्या तक्रारीबाबत कुठलीच कारवाई होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) धनंजय मुंडेंना पाठीशी घालत आहे. मी पवारसाहेबांची आतापर्यंत इज्जत करत होते. मात्र, या प्रकरणात अशा लोकांना ते पाठीशी घालत आहेत. हे पाहून वाईट वाटत. माझी मुलगी ही परिषद घेणार होती. मात्र, तिला धमकी येत असल्यामुळे ती आली नाही. मुंडे मंत्रीपदाचा पुरेपुर गैरवापर करत आहेत.

मी खंडणी मागते असं धनंजय मुंडे आरोप करतात. मात्र, मी ५ कोटींच्या घरात राहते त्या घरावर अडीच कोटींचं कर्ज आहे. तसेच माझ्या सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज घेतले आहे . मी माझ्या खात्यावरून धनंजय मुंडेंना १ कोटी रुपये दिले. वेळोवेळी मी मुंडेंच्या सांगण्यावरून त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना पैसे दिले. मी सध्या सोनं विकून घर चालवते' असही शर्मा यांनी सांगितलं.

शिवाय मी एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल असं देखील त्या यावेळी म्हणाल्या. शिवाय मुंडे यांनी मी, सध्याची पत्नी आणि बहिण यांच्या व्यतिरिक्त ३ मुलींना फसवलं आहे. मी ब्लॅकमेलर नाही. पण, जी पत्नी सध्या त्यांच्यासोबत आहे ती ब्लॅकमेल आहे. मी जर ब्लॅकमेल करत असते तर मी कर्जबाजारी नसते. या पूर्वी माझे कर्ज धनंजय मुंडे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांकडून भरतात ते आजही भरत आहेत असही त्यांनी सांगितलं.

धनंजय मुंडेंनी अन्य मुलींचे अश्लील व्हिडिओ क्लिप बनवल्या -

मी पवार यांनाही पत्र लिहून पाठवलेले आहे. मुंडेंना बोलवून समजवा मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. परळीतील बबन गिते यांनाही अडकवण्यात मुंडेंचा हात आहे. धनंजय मुंडे कॅरेक्टरलेस मंत्री, त्यांनी अन्य मुलींच्याही अश्लील व्हिडिओ क्लिप बनवल्या आहेत. त्या आधारेच ते त्यांना ब्लॅकमेल करतात. मी आतापर्यंत गप्प होती. मात्र, आता मी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचंही शर्मा म्हणाल्या.

तसंच माझा मुद्दा विरोधीपक्ष नेतेही उचलून धरत नाहीत. कारण, ते एकमेकांना मिळालेले असल्याचा आरोप करत आपण धनंजय मुंडे यांच्याविरोधात न्यायालयात, मुंडे यांना मंत्रीपदावरून हटवा, त्यांनी न्यायालयात दिलेल्या खोट्या माहितीसाठी फसवणूक केल्याचा ठपका ठेवा, मी माध्यमांसोबत लग्नासंदर्भात बोलणार नाही, त्यातून सूट मिळावी, अशा तीन याचिका दाखल केल्या असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : - राष्ट्रवादी शरद पवार गटाची मंडल यात्रा जालन्यात दाखल

Bus Accident : बस- ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पारोळा- भडगाव रस्त्यावरील घटना

Shocking : मिठाईचं आमिष दाखवतं झुडपात नेलं; अंगणवाडीत गेलेल्या ५ वर्षीय चिमुकलीवर १५ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार

Jui Gadkari: जुई गडकरीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहून सौंदर्याचं कौतुक

Indian Railway: आता मोठं बिऱ्हाड ट्रेननं नेता येणार नाही; विमान प्रवासाचा नियम रेल्वेमध्ये होणार लागू, वाचा काय आहे कारण

SCROLL FOR NEXT