पटना : बिहारमध्ये खळबळ माजवणारी घटना उघडकीस आली आहे. भाजपचे माजी आमदार चितरंजन शर्मा (chitranjan sharma) यांच्या दोन्ही भावांची गोळ्या घालून (double murder case) हत्या करण्यात आलीय. या दुहेरी हत्याकांडामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. या हत्येमागे एका बड्या गॅंगचा (Gang war) हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, वर्चस्वाच्या लढाईमुळं हत्याकांड झाला असल्याची माहिती मिळतेय.
प्राथमिक माहितीनुसार, भाजप नेता आणि माजी आमदार चितरंजन शर्मा यांच्या दोन्ही सख्ख्या भावांची पूर्व वैमनस्यातून एका गॅंगने गोळ्या घालून हत्या केल्याचं समजते. ज्या दोघांची हत्या झाली त्यापैकी एक जण चार्टड अकाउंट आहे. तर शर्मा यांचा दुसरा भाऊ पत्रकार असल्याचं बोललं जात आहे.
या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पटनाचे एसएसपी मानव जीत सिंह यांनी गॅंगवार मध्ये हे हत्याकांड झालं असल्याचं म्हटलं आहे. दोन्ही पार्ट्यांमध्ये वर्चस्वाच्या लढाईमुळं हत्याकांड झाला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.