Dombivli News Saam Tv
मुंबई/पुणे

Ganeshotsav : गणेशभक्तांवर वेगळंच संकट! ऑर्डर पूर्ण करू शकला नाही, मूर्तिकार अचानक गायब, मूर्तीसाठी धावाधाव

Dombivli News : डोंबिवलीतील फुले रोडवर गणेशोत्सवाच्या तोंडावर मूर्तिकार अचानक पळून गेला. बुकिंग केलेल्या भाविकांची फसवणूक करण्यात आली असून पोलिस चौकशी सुरू आहे

Alisha Khedekar

  • डोंबिवलीतील मूर्तिकार ऑर्डर्स न देता पळून गेला

  • भाविकांची बुकिंगची रक्कम अडकली, मूर्ती मिळाल्या नाहीत

  • संतप्त भक्तांनी प्रशासन आणि पोलिसांकडे तक्रार केली

  • गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी भाविकांची मोठी गैरसोय

गणेशोत्सवाच्या तोंडावर डोंबिवली पश्चिमेतील फुले रोडवर असलेल्या प्रसिद्ध गणपती कारखान्यातील मूर्तिकार पळून गेल्याची घटना समोर आली आहे. उद्या म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी गणपती बाप्पा सर्वांच्या घरात विराजमान होणार आहेत. मात्र घेतलेली ऑर्डर पूर्ण करता न आल्याने मूर्तिकार पळून गेल्याचं धक्कादायक कारण सामोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंदी कला केंद्राच्या मूर्तिकाराने यंदा नेहमीपेक्षा अधिक ऑर्डर्स स्वीकारल्या होत्या. शहरात आणि आसपासच्या भागातून गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने बुकिंग केल्यामुळे वर्कशॉपमध्ये प्रचंड कामाचा ताण निर्माण झाला. एकट्याने हे सर्व काम पूर्ण करणे अशक्य होत असल्यामुळे आणि दबाव हाताळता न आल्यामुळे मूर्तिकाराने पलायन केल्याचे समोर आले आहे.

या अचानक झालेल्या घडामोडीमुळे भाविकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. बुकिंग करून पैसे दिलेल्या भाविकांना मूर्ती मिळाली नाही, तर काहींना जबरदस्तीने कारखान्यातून लहान-मोठ्या मूर्ती घ्याव्या लागल्या. काहींच्या हातात मात्र काहीच आले नाही, तर त्यांचे पैसे अडकले आहेत. त्यामुळे संतप्त भाविकांनी मूर्तिकाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने यात तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली असून, डोंबिवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मूर्तिकार नेमका कुठे गेला, त्याने पलायन का केले, याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा आणि भावनिक उत्सव मानला जातो. गणेशोत्सवाच्या केवळ काही तास आधी अशा प्रकारची घटना घडल्याने भक्तांची मोठी गैरसोय झाली आहे. दरम्यान, गणेश भक्तांनी मूर्तिकाराविरोधात आवाज उठवला असून, संबंधित घटनेची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Ekvira: मुंबई ते एकवीरा प्रवास कसा कराल? जाणून घ्या सर्वात सोयीस्कर मार्ग आणि टिप्स

गुन्ह्याची माहिती न दिल्यास जाणार उमेदवारी; ऐन निवडणुकीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Instant Maggi Recipe: पचपचीत मॅगी खाणं सोडा, या 5 वेगवेगळ्या पद्धतीने बनवा टेस्टी चमचमीत मॅगी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा भाजपला दे धक्का, बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Ratnadurg Fort History: रत्नागिरीत असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्याला 'या' नावानेही ओळखले जाते, प्रत्येकाने पाहिलाच हवा

SCROLL FOR NEXT