Mumbai Mantralaya Saam Tv
मुंबई/पुणे

नव्या वर्षात 'बदल्यांची लाट; 10 IAS अधिकाऱ्यांची ट्रान्सफर, कोणाची नियुक्ती कुठे? वाचा

ias transferred update : नव्या वर्षात 'बदल्यांची लाट पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सनदी अधिकाऱ्यांची लाट पाहायला मिळत आहे.आज १० अधिकाऱ्यांची बदली झाल्याची माहिती हाती आली आहे. जाणून घ्या कोणाची नियुक्ती कुठे? वाचा

Saam Tv

मुंबई : राज्यात सत्ता बदलताच प्रशासनात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. मागील काही दिवसांपासून सातत्याने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ लागल्या आहेत. त्यात आता आणखी १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या आठवड्याभरात सनदी अधिकारी हर्षदीप कांबळे यांची दुसऱ्यांदा बदली झाली आहे. यात पुणे, सातारा अशा विविध जिल्हाधिकारीपदाचाही समावेश आहे.

राज्य सरकारने नुकतीच नियुक्त केलेले मुंबईतील बेस्टचे महाव्यवस्थापक हर्षवर्धन कांबळे यांची पुन्हा बदली झाली आहे. सातारा जिल्हाधिकारी यांची आता पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोब इतर विभागातही बदल्या झाल्या आहेत. मागील काही दिवसांत राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांची लाट पाहायला मिळत आहे.

विकास चंद्र रस्तोगी प्रधान सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग., मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव (कृषी), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

डॉ.हर्षदीप कांबळे यांना प्रधान सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

मिलिंद म्हैसकर अतिरिक्त मुख्य सचिव (1), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वने), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बी. वेणुगोपाल रेड्डी, अतिरिक्त मुख्य सचिव (वने), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली.

विकास चंद्र रस्तोगी प्रधान सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग., मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव (कृषी), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

विनिता वैद सिंगल, प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती

संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांची जिल्हाधिकारी, सातारा म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

जितेंद्र दुडी जिल्हाधिकारी, सातारा यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती

I.A.कुंदन , प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांची प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती

डॉ. निपुण विनायक यांची प्रकल्प संचालक, RUSA, उच्च तंत्रशिक्षण विभाग, मुंबई यांना सचिव (1), सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई नियुक्ती करण्यात आली आहे.

जयश्री भोज व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांची सचिव, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती

डॉ. सुहास दिवसे जिल्हाधिकारी, पुणे यांची सेटलमेंट कमिशनर आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे म्हणून नियुक्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Maharashtra Live News Update: - सोलापूर जिल्ह्यात माढा येथे सर्वाधिक पुरस्थिती

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

SCROLL FOR NEXT