IAS Pooja Khedkar Case Saam Digital
मुंबई/पुणे

Pooja Khedkar: पूजा खेडकरचा आणखी एक प्रताप, UPSC ला फसवण्यासाठी रचलं होतं षडयंत्र?

Priya More

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात (IAS Pooja Khedkar Case) मोठी बातमी समोर आली आहे. पूजा खेडकरचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. पूजा खेडकरने स्वतःच्या फायद्यासाठी षडयंत्र रचले होते. षडयंत्र रचण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पूजा खेडकरने प्लॅनिंग केले होते. यूपीएससीला फसवण्यासाठी पूजा खेडकरने हे षडयंत्र रचले होते आणि यामध्ये बाहेरच्या काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. पटियाला हाऊस कोर्टाने नोंदवलेल्या निरिक्षणातून ही मोठी माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दिल्लीत दाखल आहे.

पूजा खेडकरचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. पूजा खेडकरने ९ वेळा परीक्षा देण्याची मुभा असतानाही १२ वेळा परीक्षा दिल्या. केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) पाठविलेल्या नोटीसमधून ही धकाकदायक माहिती समोर आली आहे. ही नोटीस प्रशासनामार्फत पूजा खेडकरच्या रहिवासी पत्ता तसेच ईमेलवर पाठवण्यात आली आहे. खेडकर यांची २०२२ मधील आयएएस म्हणून बहुविकलांग या प्रवर्गातील ‘पर्सन वुइथ बेंचमार्क डिसअबिलिटीज’ (पीडब्ल्यूबीडी) या विशेष उपवर्गातून निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी विविध प्रवर्गांसाठी किती वेळा परीक्षा देता येऊ शकते याच्या अटी आहेत. या सगळ्या अटी आणि शर्ती डावलत पूजा खेडकर यांनी नाव बदलून परीक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे. पूजा खेडकरने कधी वडिलांचे नाव बदलले तर कधी आईचे नाव बदलून ही परीक्षा दिला होती. आता पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्र, ओबीसी क्रिमी लेयर सर्टिफिकेट या कागदपत्रांची चौकशी होणार आहे. पण गुन्हा दाखल झाल्यापासून पूजा खेडकर गेल्या १० ते १२ दिवसांपासून नॉट रिचेबल आहे.

दरम्यान, पूजा खेडकरला गुरूवारी कोर्टाने मोठा दणका दिला. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. अशामध्या पूजा खेडकर परदेशात पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अटकेच्या भीतीने ती परदेशात पसार झाल्याची चर्चा रंगली आहे. बनावट प्रमाणपत्राद्वारे आरक्षणाचा लाभ घेणे, खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणे तसेच खासगी वाहनावर लाल अंबर दिवा लावणे, असे विविध आरोप पूजा खेडकरवर आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT