Chandrakant Patil On Pawar Family Saam TV
मुंबई/पुणे

Chandrakant Patil: मी तुमची सगळी प्रकरणं बाहेर काढणार; चंद्रकांत पाटलांचं पवार घराण्याला डायरेक्ट चॅलेंज

Chandrakant Patil On Pawar Family: राष्ट्रवादी मला वारंवार टार्गेट करते. मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे, म्हणून हे त्यांच्या डोळ्यात खुपतं असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

साम ब्युरो

Chandrakant Patil Today News: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे काही आंबेडकरी विचारांच्या तरुणांनी त्यांच्यावर काल, शनिवारी पुण्यात शाईफेक केली होती. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापलं आहे. शाईफेकीच्या घटनेमागे शरद पवारांचा हात असल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत पाटलांनी केला होता.

शाईफेक झाल्यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  माध्यमांशी बोलताना आक्रमक झाले होते. यावेळी ते त्यांनी पवार कुटुंबियांना आवाहन दिलं आहे. मी पवारांना डायरेक्ट चॅलेंज करतो की, तुमची सगळी प्रकरणं बाहेर काढणार असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी मला वारंवार टार्गेट करते. मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे, म्हणून हे त्यांच्या डोळ्यात खुपतं. पवार घराणं, ठाकरे घराणं मला टार्गेट करते. संजय राऊत, आदित्य ठाकरे, नव्याने आलेल्या सुषमा अंधारे मला टार्गेट करतात. यांना महाराष्ट्रात घराणेशाही आणायची आहे.

रोहित पवार यांनी गेले २ ते ३ दिवस वातावरण बिघडवलं असा आरोप करत रोहित पवारांनी आंबेडकर वाचले आहेत का? रोहित पवार माझ्या समोर येऊन बसा असं ते म्हणाले. तसेच मी कुणालाही घाबरणार नाही, मी चळवळीतून आलेलो आहे. मी पवारांना डायरेक्ट चॅलेंज करतो की, तुमची सगळी प्रकरणं बाहेर काढणार असं थेट आवाहन चंद्रकांत पाटील यांनी पवार घराण्याला दिलं आहे. (Latest Marathi News)

यावेळी त्यांनी एका पत्रकारावरही आरोप केला आहे. बरोबर शाही फेकतानाच कसा पत्रकाराला अॅंगल मिळाला? त्या पत्रकारावर कारवाई झाली नाही तर मी आंदोलनाला बसेल. हा काही पत्रकारितेला शोभणार विषय नाही. ही वृत्ती मोडून काढावी लागेल. मी अपील केलंय की कुणी काही करायचं नाही. उद्या पंतप्रधान मोदी राज्यात आहे म्हणून हे सगळं चाललंय असं पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील नेमकं काय बोलले होते?

भाजप नेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी काल औरंगाबादेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 'कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणारा कोण?

मिळालेल्या माहितीनुसार, शाईफेक करणारे कार्यकर्ते हे समता सैनिक दल या संघटनेचे होते. समता सैनिक दलाच्या मनोज गरबडे या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकल्याचं सांगितलं जात आहे. गरबडे हा अनेक वर्षांपासून समता सैनिक दलात कार्यरत आहे. तो चिंचवड परिसरात वास्तव्याला आहे.

तसेच तो अनेक सामाजिक कार्यात देखील कार्यरत आहे. कट्टर आंबेडकरवादी विचारांचा कार्यकर्ता म्हणून मनोज गरबडे याची ओळख असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्याने चंद्रकांत पाटलांवर शाईफेक केल्याचे समजते. या घटनेनंतर पोलिसांकडून त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्ते चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Raj Thackeray School: राज ठाकरेंचं शिक्षण दादरच्या या शाळेत झालं आहे

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

SCROLL FOR NEXT