Vasant More Threat Call Saam Tv
मुंबई/पुणे

Vasant More Threat Call: 'एक तारखेआधी मी मोरेचा खून करणार', वसंत मोरे यांना धमकीचा फोन; ऑडिओ क्लिप व्हायरल

Vasant More News: वसंत मोरे आणि त्यांच्या भाच्याला धमकी देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीकडून त्यांना फोनवर धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे आणि त्यांच्या भाच्याला धमकी देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीकडून त्यांना फोनवर धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. याची एक ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वसंत मोरे यांनी आपल्या तक्रारीत काय म्हटलं?

वसंत मोरे यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, ''मागील 15 दिवसापूर्वी मी माझ्या नित्यक्रमाने दिवसभर माझ्या कामात व्यस्त होतो. मला माझ्या मोबाईलवर एक अनोळखी व्यक्तीने फोन करून शिव्या ‌द्यायला सुरुवात केली. मी त्याला कारण विचारले असता त्याने काहीही न सांगता शिव्या देणे सुरु ठेवले. मग मी दुर्लक्ष करून त्याचा फोन कट केला. तो परत फोन करून शिव्या देऊ लागला.''

त्यांनी तक्रारीत म्हंटल आहे की, ''मी माझ्या कामात व्यस्त असल्याने मी त्याचा नंबर ब्लॉक केला. मग त्याने दुसऱ्यानंबरवरून कॉल करायला सुरुवात केली. मग मी माझा भाचा प्रतीक कोडीतकर याला फोन करून सांगितले की, मी कामात आहे, कोणीतरी या नंबरवरून फोन करून मला शिव्या देत आहे. तू याला फोन करून माहिती घे की, त्याचा काय प्रॉब्लेम आहे. मग प्रतीकने त्याला फोन केल्यावर त्याने प्रतीकलाही शिवीगाळ करायला सुरुवात केली.''

तक्रारीत लिहिलं आहे की, अज्ञात व्यक्ती म्हणलं की, ''येत्या एक तारखेच्या आधी मी वसंत मोरेचा खून करणार असे बोलून संबंधित व्यक्ती शिव्या देऊ लागला. राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना अशा गोष्टी घडत असतात असा विचार करून मी त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु सद्‌यस्थितीत सुरु असलेल्या घटना लक्षात घेता ही, गोष्ट गांभीर्याने घेणे मला महत्त्वाचे वाटले म्हणून आपणास मी या पत्रा‌द्वारे विनंती करत आहे की, मला फोन करून धमकी देणाऱ्या सदर व्यक्तीचा शोध आपण घ्यावा.

मोरे तक्रारीत पुढे म्हटलं आहे की, ''या सर्व प्रकरणामागे व मला जीवेमारण्याची धमकी ‌द्यायला लावण्यामागे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर असल्याचा मला दाट संशय आहे. तरी मी आपणास विनंती करतो की, मला फोन करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला व मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांना अटक करावी, अन्यथा रविवार दिनांक 21 जुलै 2024 रोजी सकाळी दहा वाजता भारतीय वि‌द्यापीठ पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येईल याची आपण नौद घ्यावी.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Exit Poll: सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप की शिवसेना ठाकरे गट कोण मारणार बाजी? पाहा Exit Poll

Irregular Periods: गरम पाण्यात तूप टाकून प्यायल्यास पिरीयड्सची समस्या होईल दूर; अनिरुद्धचार्यांच्या दाव्यावर तज्ज्ञांची प्रतिक्रिया

Kudal Exit Poll: राणेंचं कडवं आव्हान, वैभव नाईक गड राखणार का? पाहा Exit पोलचा अंदाज

Arjun Kapoor: समांथाच्या कवितेवर अर्जुन कपूरची हटके रिॲक्शन, म्हणाला...

Paithan Exit Poll: पैठणकर कुणाच्या बाजूने, विलास भुमरेंना पुन्हा पसंती मिळणार का? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT