Bacchu Kadu News Saam Tv
मुंबई/पुणे

Bacchu Kadu News: 'NDA बैठकीचं निमंत्रण मिळालं, मात्र मी जाणार नाही', बच्चू कडू यांनी सांगितलं कारण...

'NDA बैठकीचं निमंत्रण मिळालं, मात्र मी जाणार नाही', बच्चू कडू यांनी सांगितलं कारण...

Satish Kengar

>> सुरज मसुरकर

Bacchu Kadu On NDA Meeting: मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला विरोधी आघाडी 'इंडियाची'ची तिसरी बैठक होणार आहे. यातच विरोधी आघाडीच्या या बैठकीला प्रत्युत्तर म्हणून आता एनडीएचीही बैठक होणार आहे. दोन्ही आघाडीची ही बैठक एकाच तारखेला मुंबईत होणार आहे, हे विशेष आहे. याच एनडीएच्या बैठकीचं निमंत्रण प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडे यांनाही मिळालं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र ते या बैठकीला उपस्थित राहणार नाही. याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.

याबाबत माहिती देताना बच्चू कडू म्हणाले की, ''१ तारखेला होणाऱ्या महायुतीच्या बैठकिचं नुकतच निमंत्रण मला मिळालं. पण त्यावेळेस दिव्यांग आपल्या दारीचा कार्यक्रम हा पूर्वनियोजित आहे. त्यामुळे मी त्या बैठकिस उपस्थित नसणार आहे.''

मी मंत्रीपदावरचा दावा सोडला

गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा आहे. मात्र या चर्चेला त्यांनीच आता पूर्णविराम दिला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले आहेत की, ''मला दिव्यांग मंत्रालय मिळालंय, त्यामुळे मी मंत्रीपदावरचा दावा आता सोडून दिलेला आहे. जे माझं स्वप्न होतं दिव्यांग मंत्रालयाचं, ते पूर्ण झालं. याहून अधिक काय हवं. देवाकडे मागितला एक डोळा त्याने दिले दोन डोळे.'' (Latest Marathi News)

स्पर्धा परीक्षेच्या गोंधळावर काय म्हणाले?

बच्चू कडू म्हणाले की, ''स्पर्धा परीक्षेच्या गोंधळाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. उत्तराखंडच्या धर्तीवर आपल्याकडेही कडक कायदा याबाबत करायला हवा. जेणे करून पेपर फुटी व स्पर्धा परीक्षेतील गैर व्यवहाराला आळा बसेल.''

शेतकरी आंदोलनावर बोलताना ते म्हणाले, ''शेतकऱ्यांची सुरू असलेली आंदोलनं रास्त आहेत. पीकांना हमी भाव नसल्यावर तो तरी काय करेल. दुसरीकडे काल मंत्रालयात झालेले आंदोलनही जे धरणग्रस्त शेतकरी आहे, त्याचे इतके वर्ष प्रश्न मार्गी लागत नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माहिममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर; ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवर

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

SCROLL FOR NEXT