'मुख्यमंत्री' काय म्हणाले मला माहित नाही, मी माझी कामं करतोय - अजित पवार SaamTV
मुंबई/पुणे

'मुख्यमंत्री' काय म्हणाले मला माहित नाही, मी माझी कामं करतोय - अजित पवार

चंद्रकांत पाटील केंद्रात मंत्री होणार असतील तर ते मोदींना विचारलं पाहिजे.

अश्विनी जाधव केदारे साम टीव्ही पुणे

पुणे : मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आज 'आजी-माजी एकत्रित आले तर भावी सहकारी होऊ शकतात' असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावरुन अनेक राजकीय तर्क वितर्क लढवले जात आहेत. तर अनेक राजकीय चर्चांना उधान आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या (Chief Minister) याच वक्तव्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) प्रश्न विचारला असता 'मुख्यमंत्री' काय म्हणाले मला माहित नाही, मी माझी माझी काम करत असतो असं पवार म्हणाले. (I don't know what the 'Chief Minister' said. Ajit Pawar's statement)

हे देखील पहा-

मराठवाडा (Marathwada) मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबादमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होते या कार्यक्रमाच्या मंचावरती भाजपनेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, (Ravasaheb Danave) कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात (Balasaheb Danave) तसेच एमआयएमचे इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) उपस्थित होते. या वेळी भाषणामध्ये बोलताना 'आजी माजी एकत्र आले तर भावी सहकारी होऊ शकतात' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) म्हणाले आणि याच वक्तव्यावरती उपमुख्यमंत्री अजित पावार यांना त्यांच्या पुण्यातील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता 'यामधील मला काही माहित नाही. मी माझी माझी काम करत असतो.' असं अजित पवार म्हणाले.

तसेच चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) केंद्रात मंत्री होणार असतील तर ते मोदींना (Narendra Modi) विचारलं पाहिजे आणि 'मुख्यमंत्री जेंव्हा मला भेटतात तेंव्हा ते म्हणतात की राज्याला आपल्याला पुढे घेउन जायचं आहे'. एवढंच बोलतात. शिवाय मी विकासाला महत्व देतो आता गणेश विसर्जन आहे तिकडे लक्ष द्यायचं आहे तसेच कोरोना चं सावट आहे त्याकडे माझं लक्ष आहे. असं म्हणत अजित पवारांनी या प्रश्नाला बगल दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कोल्हापूर महानगर पालिका निवडणूक, जनसुराज्य शक्ती – आरपीआय – पीआरपी यांचा ‘सुराज्य संकल्प’ जाहीरनामा जाहीर

आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT