Rahul Narwekar On Shiv Sena Mla Disqualified Case Verdict Saam Tv
मुंबई/पुणे

Rahul Narwekar: 'मी कोणालाही संतुष्ट करायला निकाल दिला नाही', राहुल नार्वेकर यांनी नाव न घेता ठाकरेंना सुनावलं

Shiv Sena Mla Disqualified Case Verdict: ''मी कोणालाही संतुष्ट करायला निकाल दिला नाही,'' असं नाव राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन गाड

Rahul Narwekar On Shiv Sena Mla Disqualified Case Verdict:

''मी कोणालाही संतुष्ट करायला निकाल दिला नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तत्त्वानुसार निकाल दिला. भारतातील कुठलाही नागरिक न्यायालयात दाद मागू शकतो,'' असं नाव न घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं आहे. आजू माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले, ''याचिका गेली म्हणजे निकाल चुकीचा म्हणता येणार नाही. निकालात काय चुकीचं आहे, हे न्यायालयात दाखवून द्यावं लागेल. निकालातील सर्वप्रथम मुद्दा हा आहे की, 2018 मध्ये जी घटना दुरुस्ती केली, ती ग्राह्य धरायची की, 1999 ची ग्राह्य धरायची.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ''माझ्याकडे ते पत्र देण्यात आलेला आहे. 4 एप्रिल 2018 च्या पत्रात केवळ पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीचे निकाल आयोगाला कळवण्यात आले होते. घटना बदला बाबत त्या पत्रात काहीही नव्हतं.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाबाबत ठाकरे गट उद्या महापत्रकार परिषद घेणार आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले, ''त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी की, नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पत्रकार परिषद घेऊन निर्णय बदलणार नाही. माझ्या निर्णयात बेकायदेशीर काय ते सांगा. जर केवळ टीका आणि आरोप करत असतील तर जनता सुज्ञ आहे.''

राष्ट्रवादीच्या दोन गटाच्या सुनावणीवर नार्वेकर म्हणाले, ''31 जानेवारीपर्यंत हा निकाल द्यायचा आहे. लवकरात लवकर निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न असेल. उद्याच्या सुनावणी बाबत विधिमंडळ सचिवालय कळवेल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

SCROLL FOR NEXT