Dharavi Project: धारावीकरांना मिळणार 350 चौरस फुटाचे घर, अदानी समूहाने सांगितला संपूर्ण प्लान

Adani Group on Dharavi Project : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी, अशी ओळख असलेल्या धारावीचा पुनर्विकास होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
Adani Group on Dharavi Project
Adani Group on Dharavi ProjectSaam Tv
Published On

>> संजय गडदे

Adani Group on Dharavi Project :

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी, अशी ओळख असलेल्या धारावीचा पुनर्विकास होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पात्र झोपडीधारकांना पाचशे चौरस फुटाचे घर मिळावे, अशी मागणी धारावीकरांकडून केली जात आहे.

अशातच आज धारावी प्रकल्पावर काम करणाऱ्या अदाणी समूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) या विशेष हेतू कंपनीने पात्र झोपडीधारकांना साडेतीनशे चौरस फूट घर देण्याची घोषणा आज केली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Adani Group on Dharavi Project
Davos Economic Forum 2024: 3 लाख 10 हजार कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी करार होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धारावीतील घराचे क्षेत्रफळ हे मुंबईतील अन्य झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या तुलनेत १७ टक्के अधिक असून धारावीकरांसाठी उभारल्या जाणाऱ्या इमारतीत स्वतंत्र स्वयंपाकघर आणि शौचालयासोबत खासगीपणा, स्वच्छता आणि मूलभूत सुखसोयींची सोय असणार आहे. मात्र अदानी समूहाने जाहीर केलेले क्षेत्रफळ धारावीकर मान्य करतील का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.  (Latest Marathi News)

दरम्यान, धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम अदानी समूहाला देण्यात आल्याने ठाकरे गटाच्या वतीने विशाल मोर्चा काढण्यात आला होता. तसेच यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता.

Adani Group on Dharavi Project
BSP chief Mayawati: ना INDIA ना NDA... बसपा प्रमुख मायावतींची मोठी घोषणा; आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा

या आरोपांना अदानी समूहाकडून प्रसिद्धीपत्रक जाहीर करत स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. यात सांगण्यात आलं होतं की, ''मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्प निष्पक्ष, खुल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे अदानी समूहाला देण्यात आला. तसेच महाविकास आघाडी (MVA) सरकार सत्तेवर असताना निविदा अटींना अंतिम रूप देण्यात आले.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com