मुंबई: ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन (OBC Political Reservation) राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपने काल (बुधवारी) मंत्रालयावर मविआ सरकारविरोधात मोर्चा काढला होता. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका करत असताना जीभ घसरली. त्यांच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. अशात सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे (Sadanand Sule) यांनी चंद्रकांत पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मला मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे असं म्हणत त्यांनी पत्नी सुप्रिया सुळे यांची पाठराखण केली आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांनी सर्वच महिलांचा अपमान केला आहे असं म्हणत सदानंद सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. (Sadanand Sule Slams Chandrakant Patil)
हे देखील पाहा -
नेमकं काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. 'मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी ओबीसी आरक्षणासाठी संपर्क केला पण त्यांनी दिल्लीत जाऊन काय केले हे सांगितले नाही',अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली. "तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा, स्वयंपाक करा. ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी दिल्लीत जा अन्यथा मसणात जा. पण आरक्षण द्या. तुम्ही खासदार असून तुम्हाला एका मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची हे कळत नाही?" अशा कडक शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका केली होती.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेबाबत सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सदानंद सुळे म्हणाले की, "महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे सुप्रियांबद्दल बोलत आहेत. मला नेहमीच वाटत होतं की हे स्त्रीद्वेषी आहेत. जिथं शक्य होईल तिथं महिलांचा अपमान करतात. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे. ती गृहिणी आहे. आई आहे... आणि यशस्वी राजकारणी आहे. देशातल्या इतर मेहनती आणि गुणवान महिलांप्रमाणे... चंद्रकांत पाटलांनी सर्वच महिलांचा अपमान केला आहे." असं ट्वीट सदानंद सुळे यांनी केलं आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.