Mumbai High Court Saam TV
मुंबई/पुणे

Husband Wife Dispute: ‘तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस’ पत्नीला असं म्हणणं क्रूरता नाही; हायकोर्टाची टिप्पणी

Vishal Gangurde

Mumbai High Court:

मुंबई हायकोर्टाने घटस्फोटाच्या एका प्रकरणावर मोठी टिप्पणी केली आहे. ‘तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस’, असं पत्नीला म्हणणं अपमानजनक आणि क्रूरता नाही. केवळ जेव्हा व्यक्तीला समोरच्या व्यक्तीस अपमानित करण्याचा हेतू नसेल, अशी टिप्पणी मुंबई हायकोर्टाने केली आहे. (Latest Marathi News)

बार अँड बेंचच्या रिपोर्टनुसार, न्यायाधीश नितीन सांबरे आणि शर्मिला देशमुख यांच्या घटनापीठाने म्हटलं की, 'घरात जेव्हा मराठीमध्ये कुटुंबातील सदस्य बोलत असतात. तेव्हा सामान्यपणे अशी वाक्ये बोलली जातात. त्यामुळे त्याला अपमानित करणारे वाक्य म्हणता येणार नाही. एखाद्याचा अपमानित करण्याचा हेतू नसेल तर त्यास आपण क्रूरता म्हणता येणार नाही'.

काय आहे प्रकरण?

दरम्यान, एका महिलेने तिच्या पतीवर मानसिक आणि शारीरिक शोषणाचे आरोप केले होते. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा पती घरी उशीरा यायचा. तसेच तिला घराबाहेर जाण्यास मज्जाव करायचा. तसेच पत्नीचा आरोप होता की, 'पती हा मानसिक आणि शारीरिक छळ करायचा. तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस', असे तो बोलायचा'.

दुसरीकडे, पतीने दावा केला आहे की, 'पत्नीचं वागणं क्रूरतेसारखं होतं'. पतीने आरोप केला आहे की, 'पत्नीने अनेक निराधार आरोप करत समाजातील कुटुंबाची प्रतिष्ठा कमी केली आहे. ही एक प्रकारची क्रूरताच आहे'.

तत्पूर्वी, महिलेने दाखल केलेल्या एफआयरची फेरतपासणी केल्यानंतर पत्नीने खोटे आरोप केल्याचे सिद्ध झाले. तसेच कोर्टाने या प्रकणावर टिप्पणी करताना म्हटलं की, 'महिलेने आरोप केल्यानंतर त्या घटनेचा तपशील देखील दिला नाही. महिलेच्या पतीने ज्या शब्दाचा वापर केला, ते शब्द अपमाजनक नाहीत'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT