Gujarat News: १० वर्षीय मुलीनं IPS अधिकाऱ्यांसह ८० पोलिसांना गरगर फिरवलं; कहाणी क्राइम पट्रोलपेक्षाही भयंकर निघाली!

Rajkot Kidnapping News: १० वर्षीय मुलीनं IPS अधिकाऱ्यांसह ८० पोलिसांना गरगर फिरवलं; कहाणी क्राइम पट्रोलपेक्षाही भयंकर निघाली!
Rajkot Kidnapping News
Rajkot Kidnapping NewsSaam tv
Published On

Rajkot Kidnapping News:

नाट्यरुपांतर केलेल्या एखाद्या क्राइम शोलाही लाजवेल, अशी भयंकर, पण तितकीच 'चक्रावणारी' कहाणी गुजरातच्या राजकोटमध्ये घडली आहे. या घटनेचा खुलासा झाल्यानंतर तपास करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांसह ८० पोलीस कर्मचाऱ्यांनी डोक्यावर हात मारला. कारण त्यांना अवघ्या १० वर्षांच्या मुलीनं रचलेल्या 'कथित' कहाणीनं चक्रावून सोडलं होतं.

शुक्रवारची सकाळ उजाडली. अवघ्या १० वर्षांची मुलगी आपल्या बाबांसोबत प्रद्युमन नगरातील पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथं तिनं हादरवून सोडणारी कहाणी सांगितली. सकाळी शिकवणी वर्गाला जात असताना वाटेत एक कार आली. त्यातील काही लोकांनी मला 'किडनॅप' केलं, असं तिनं पोलिसांना सांगितलं.

Rajkot Kidnapping News
OBC Reservation: 'ओबीसी आरक्षणात वाटेकरी येऊ देणार नाही', उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

मुलीनं पोलिसांना काय सांगितलं?

पोपटपरा परिसरातील आपल्या घरातून ट्युशनसाठी सकाळी निघाले होते. त्याचवेळी तिथं एक कार आली. त्या कारमधील माणसांनी मला कारमधून नेले. कारमध्ये आणखी एक मुलगी होती. तिला काही वेळाने एका रेल्वेच्या पुलाखाली सोडून दिले. त्यानंतर पुढे रेल्वे स्टेशनकडे मला कारने घेऊन गेले. (Latest Marathi News)

अन् पोलीस कामाला लागले

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच अख्खी यंत्रणा कामाला लागली. तात्काळ सर्च ऑपरेशन सुरू केलं. शहर नियंत्रण कक्षाला माहिती दिली. सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट केलं. सर्व रस्त्यांवर नाकाबंदी केली. अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी पोलीस गस्त वाढवण्यात आली.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारीच नाहीत, तर स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या सर्व खबऱ्यांना कामाला लावले. संशयित अपहरणकर्त्यांची माहिती कोणत्याही परिस्थितीत मिळावी, म्हणून सर्व सूत्रे हलवली.

Rajkot Kidnapping News
Amravati News: 'बच्चू कडू मंत्रिपदासाठी सरकारला ब्लॅकमेल करतात', रवी राणांनी उडवून दिली खळबळ

सीसीटीव्ही फुटेज तपासले, पण...

मुलीने सांगितल्यानुसार, पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील सर्व फुटेज तपासले. नेमकं काय घडलं याचा शोध त्या पोलिसांची नजर घेत होती. पण त्या फुटेजमध्ये ती मुलगी फक्त एकदाच दिसून आली. त्यानंतर संशयास्पद अशा काहीच हालचाली दिसल्या नाहीत, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुधीरकुमार देसाई यांनी माध्यमांना दिली.

भलतीच खिचडी शिजवली होती...

सीसीटीव्ही फुटेजमधून काहीच हाती लागलं नाही. त्यामुळं पोलीस रिकाम्या हाती परतले. त्यांनी पुन्हा मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिचे पालक आणि महिला पोलीस कर्मचारीही होती. तिच्याकडे चौकशी केली असता, मुलीनं स्वतःच शिजवलेल्या खिचडीची 'इंटरेस्टिंग रेसिपी' सांगितली आणि पोलीसही चक्रावून गेले.

होमवर्क केला नाही, क्लासला दांडी मारायची होती...

मुलीला क्लासला जायचं नव्हतं. तसंही आईच्या धाकामुळं तिला क्लासला जावं लागत होतं. शुक्रवारी क्लासला न जाण्याचं कारण वेगळंच होतं. मुलीनं होमवर्क पूर्ण केला नव्हता. मैत्रीण आणि तिनं डोकं चालवलं. दोघांनी भयंकर कहाणी रचली. पण या कहाणीनं अख्ख्या शहरातील पोलिसांचं डोकं चक्रावून गेलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com