Pune Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: बायकोच्या छळाला कंटाळला, इमारतीवरून उडी मारत नवऱ्याची आत्महत्या; पुण्यात खळबळ

Pune Police: पुण्यामध्ये एका तरुणाने बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत त्याने आयुष्य संपवलं. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली. पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला.

Priya More

Summary:

  • पुण्यात एका तरुणाने बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली

  • इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवलं

  • पुण्यातील वारजे माळवाडीमध्ये ही घटना घडली

  • महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

पुण्यामध्ये कौटुंबिक वादातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. बायकोकडून वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून नवऱ्याने इमारतीवरून उडी मारत आयुष्य संपवलं. पुण्यातील वारजे परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यामध्ये आत्महत्या केलेल्या तरुणाच्या बायकोविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश दत्तात्रेय क्षीरसागर (वय ४० वर्षे) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होते. महेश क्षीरसागर वारजे माळवाडी परिसरातील गिरीधरनगरमध्ये कुटुंबीयांसोबत राहत होते. त्यांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. महेश त्यांचे वडील दत्तात्रेय क्षीरसागर यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात सुनेविरोधात तक्रार दाखल केली.

वारजे माळवाडी पोलिसांनी महेश यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांची पत्नी प्रतिभा क्षीरसागर (वय ३५ वर्षे) हिच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितले की, महेश क्षीरसागर यांचे १३ वर्षांपूर्वी प्रतिभासोबत लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून महेश आणि प्रतिभा यांच्यात सतत वाद होत होते. याच त्रासाला कंटाळून महेश यांनी २ फेब्रुवारीला आत्महत्या केली. त्यांच्या वडिलांनी १६ फेब्रवारीला या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT