PuneCrime News
PuneCrime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : मित्रानेच केला मित्राच्या पत्नीवर अत्याचार, माणुसकीला काळीमा फासणारी घटना

साम टिव्ही ब्युरो

Pune Crime News : पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका मित्रानेच आपल्या बहिणीच्या मदतीने मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला आहे. पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हे सर्व प्रकरण उजेडात आले. पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोप बहिण भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील (Pune) चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. साजिद कुंजू (वय ३९ वर्ष) आणि हसीना अशी या बहीण भावांची नावे आहेत. पोलिसांनी साजिद याला अटक केली आहे. पीडितेने  पोलिसांना (Police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साजेद हा तिच्या नवऱ्याचा मित्र आहे. तो पती नसताना घरी आला होता. यावेळी त्याने चोरून तिचे नग्न फोटो काढले.

त्यानंतर आरोपीने महिलेच्या मोबाईलवर फोन करून "तू मला खूप आवडतेस, तू मला खुश कर, माझ्यासोबत शारीरिक संबंध (Relationship) ठेव, माझ्यासोबत मैत्री कर असे म्हटले होते. जर असे केले नाही तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही साजिदने दिली.

दरम्यान, साजिदने महिलेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर पाठवून तुझी भर रस्त्यात बदनामी करेल अशी धमकी दिली होती. तसेच तुझ्या मुलाचे अपहरण करेन अशा धमक्या दिल्या. त्याचबरोबर मला वेगवेगळ्या ठिकाणी नेत माझ्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असं पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

आरोपी साजिदला त्याच्या बहिणीने सुद्धा साथ दिली असल्याचं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. साजिदची बहिणी तक्रारदार महिलेला वारंवार फोन करून पैशाची मागणी करत होती. तसेच माझ्या भावासोबत लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहा अशीही धमकी दिली होती. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान आक्रमक; तीन कॅफेशॉप फोडले

High Calcium Foods : दूधापेक्षा जास्त कॅल्शिअम असलेले पदार्थ; लहान मुलांच्या बुद्धीला चालना मिळेल अन् हाडं होतील मजबूत

MI Playing XI: आज अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार? LSG विरुद्ध अशी असेल मुंबईची प्लेइंग ११

Buldhana: ज्वारी खरेदीच्या निकषामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप, नोंदणी कार्यालयात तुडुंब गर्दी

Bribe Case : सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या ताब्यात; मजुरांचे पैसे काढण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच

SCROLL FOR NEXT