husband and wife are responsible for household work Bombay High Court opined Saam TV
मुंबई/पुणे

High Court News: माहेरच्यांशी बोलण्यावरून बायकोवर बंधने घालणे ही मानसिक क्रूरता; मुंबई हायकोर्टाचं मत

Mumbai High Court News: पत्नीने माहेरच्यांसोबत संपर्कात राहु नये, असा तगादा लावणे ही मानसिक क्रूरता असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं.

Satish Daud

Mumbai High Court News:

वैवाहिक नातेसंबंधामुळे पत्नी तिच्या पालकांपासून वेगळी होऊ शकत नाही. पत्नीकडून तिच्या पालकांशी संबंध तोडण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही, पत्नीने माहेरच्यांसोबत संपर्कात राहु नये, असा तगादा लावणे ही मानसिक क्रूरता असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं. एका घटस्फोट प्रकरणात हायकोर्टाने हे मत नोंदवलं आहे. (Latest Marathi News)

न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने 6 सप्टेंबर रोजी हे निरीक्षण नोंदवलं आहे. याशिवाय आधुनिक काळात नवरा-बायको दोघांनीही घरातील जबाबदाऱ्या समानतेने उचलल्या पाहिजेत, असंही कोर्टाने सांगितलं आहे.

एका 35 वर्षीय व्यक्तीचे 2010 मध्ये लग्न झाले होते लग्नाच्या 8 वर्षानंतर म्हणजेच 2018 मध्ये त्याने कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. बायको नेहमी तिच्या आईसोबत फोनवर बोलते, घरातील कामे करत नाहीत, असा दावा त्याने आपल्या अर्जामध्ये केला होता.

दुसरीकडे याचिकाकर्त्याच्या पत्नीने असा दावा केला होता की, मी ऑफिसवरुन घरी आल्यानंतर नवरा मला घरातील सर्वच कामे करायला भाग पाडत होता. तसेच तो माझ्या आई-वडिलांसोबत देखील फोनवरून बोलू देत नव्हता, तसेच त्यांना भेटूही देत नव्हता. यावेळी महिलेने तिचे शारीरिक शोषण झाल्याचा दावाही केला.

पती-पत्नीच्या या वादावर कौटुंबिक न्यायालयाने सुनावणी घेतली. दोघांचेही म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने याचिकाकर्त्या व्यक्तीचा अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला सदरील व्यक्तीने मुंबई हायकोर्टात आव्हान दिले.

6 सप्टेंबर रोजी हायकोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर पत्नीने माहेरच्यांसोबत संपर्कात राहु नये, असा तगादा लावणे ही मानसिक क्रूरता असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं. त्याचबरोबर घरातील कामांची जबाबदारी पती-पत्नी दोघांचीही आहे, असं म्हणत घटस्फोटाची याचिका फेटाळून लावली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : उद्योजक सुशील केडियाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT