some intrigue to deprive Muslim girls from education - Husain Dalwai says on Hijab Controversy Saam Tv
मुंबई/पुणे

Hijab Row: "मुस्लिम मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा धर्मांध शक्तींचा डाव" - हुसेन दलवाईंचा आरोप

Husain Dalwai Latest News: हिजाबचा प्रश्न ऐरणीवर आणून मुस्लिम मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा धर्मांध शक्तींचा डाव असल्याला आरोप माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केला आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: देशातील धर्मांध शक्ती हिजाबचा मुद्दा देशभरात ऐरणीवर आणून मुस्लिम मुलींमध्ये वाढत चाललेल्या शिक्षणाला खीळ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा डाव ओळखून मुस्लिमांनी शांततेने विचार पूर्वक हा प्रश्न हाताळायला हवा असं मत माजी खासदार मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष हुसेन दलवाई (Husain Dalwai) यांनी व्यक्त केलाय. (Husain Dalwai says on Hijab Controversy that some intrigue to deprive Muslim girls from education)

हे देखील पहा -

त्याचप्रमाणे एनआरसी (NRC) विरोधी आंदोलनात मुस्लिम महिलांच्या (Muslim Womens) संघटित शक्तीच्या देशभर प्रदर्शनामुळे केंद्र सरकार हादरल्याचं दलवाई म्हणालेत. त्यामुळे असे भावनिक मुद्दे जाणिवपूर्वक पुढे आणले जात असून देशातील शिक्षण संस्थांनी हिजाबला मुद्दा न बनवता मुस्लिम मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करावेत. मुस्लीम समाजाचे शिक्षण कुठल्याही परिस्थितीत बंद होवू नये याची जबाबदारी समाजाच्या उलमा, शिक्षित वर्ग आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घ्यावी असे आवाहन दलवाई यांनी केलयं.

हे देखील पहा -

काश्मिर फाईल्स (The Kashmir Files) सारख्या चित्रपटातून मुस्लिमांविरुद्ध खोटा इतिहास प्रस्थापित केला जात आहे आणि त्यांच्या विरोधी वातावरण भडकावले जात आहे. मुस्लिमांचे सांस्कृतिक, धार्मिक विद्रुपीकरण करून देशामध्ये हिंदू-मुस्लिम (Hindu Muslim) तेढ निर्माण होईल असे कृत्य जाणीवपूर्वक सुरु आहे. अशा कृत्याच्या विरोधात हिंदू समाजातील धर्मनिरपेक्ष विचारवंत पुढे येवून विरोध करीत आहेत याचे स्वागत करीत असताना धर्मनिरपेक्ष हिंदूंचे हात मुस्लिमांनी पाठिंबा व्यक्त करून बळकट करणे क्रमप्राप्त आहे असं देखील दलवाई म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election 2026: मतदानाचा हक्क बजावा! १५ जानेवारीला कुणाकुणाला मिळणार सुट्टी, आताच पाहून घ्या

Foods to avoid with jaggery: कोणत्या भाज्यांमध्ये गूळ वापरू नये?

Tilgul Ladoo: मकर संक्रातीला बनवा मऊसूत गूळ-शेंगदाण्याचे लाडू, नोट करा सिंपल रेसिपी

Delhi High Court : लिव्ह-इन पार्टनर्सना पेन्शन मिळणार? उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

Afternoon Sleeping Time: दुपारी कधीपण झोपू नका, 'ही' आहे योग्य वेळ

SCROLL FOR NEXT