Pune News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News : पुण्यात 'बंटी-बबली'चा शेकडो नागरिकांना कोट्यवधींचा गंडा; चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime News: पुण्यात राहणाऱ्या अविनाश राठोड आणि त्याची पत्नी विशाखा राठोड यांनी गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांची ही फसवणूक केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News: गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांची कोटीवधी रुपयांची फसवणूक करणारी बंटी-बबलीची जोडी समोर आली आहे. पुण्यातील दांपत्याने शेकडो लोकांना तब्बल १६ कोटी रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. (Pune News)

पुण्यात राहणाऱ्या अविनाश राठोड आणि त्याची पत्नी विशाखा राठोड यांनी गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांची ही फसवणूक केली आहे. पैसे गुंतवा यावर चांगले पैसे परत मिळतील असे आमिष दाखवून शेकडो लोकांना या दाम्पत्याने फसवलं आहे.  (Latest News Update)

APS वेल्थ वेंचरचे संचालक अविनाश राठोड आणि त्यांची पत्नी विशाखा यांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार २०१८ पासून सुरू होता. (Crime News)

या प्रकरणात अविनाश राठोड आणि त्यांच्या पत्नी विशाखा राठोड यांनी ज्यादा परताव्याचे अमिष दाखवून फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांकडून वेगवेगळ्या स्कीम मध्ये १ कोटी पेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूक करून घेतली.

मात्र फिर्यादी यांनी जेव्हा परताव्याची मागणी केली तेव्हा त्यांना एकही रुपया परत मिळाला नाही. अशा प्रकारे या दोघांनी मिळून शेकडो लोकांना तब्बल १५ कोटी रुपयांचा गंडा घातला. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आता दोघांच्या विरोधात चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आमदार प्रसाद लाड अंतरवाली सराटीत दाखल

Health Tips : जेवणासोबत कच्चा कांदा आणि लसूण खाण्याचे ७ जबरदस्त फायदे

पुण्यातील विद्यानंद बापटनंतर आता 'एनर्जीमॅन' कामत काकांची चर्चा, गणेशोत्सव, डीजेवर नॉनस्टॉप बोलले!

Coffee Intake: कॉफीशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही? मग जाणून घ्या दिवसाला किती कप कॉफी प्यावी

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

SCROLL FOR NEXT