BEST Bus Strike भुषण शिंदे
मुंबई/पुणे

BEST Bus Strike: दिवाळीच्या तोंडावर सांताक्रूज बेस्ट बस डेपोमधील शेकडो कर्मचारी अचानक संपावर

Mumabi Latest News: सध्यातरी हा संप सांताक्रूझ बेस्ट डेपो पुरताच मर्यादित असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भुषण शिंदे, मुंबई

BEST Bus Strike Mumbai: मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर बेस्ट (Best) बसच्या कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला आहे. यामुळे बेस्ट प्रशासनासह चाकरमान्यांचाही गोंधळ उडाला आहे. मुंबईच्या सांताक्रूज बेस्ट बस डेपोमधील शेकडो बस कर्मचारी अचानक संपावर गेले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद ठेवण्यावर हे कर्मचारी ठाम आहेत. (Mumbai Latest News)

या संपकरी कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याना दिवाळीचा बोनस मिळालेला नाही. त्यांना बेस्ट प्रशासनाने पगार 23 हजार 500 रुपये सांगितला मात्र, प्रत्यक्षात त्यांना 18 हजार 500 रुपये पगार देण्यात येतो असा आरोप या कर्मचाऱ्यांचा आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांबाबत निर्णयही झालेला नसल्याचं या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. संप करणारे हे सर्व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने रुजू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

यात कंत्राटी वाहक, चालक यांच्यासह अनेकजण संपावर आहेत. सध्यातरी हा संप सांताक्रूझ बेस्ट डेपो पुरताच मर्यादित असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. मात्र, त्यामुळे पश्चिम उपनगरात दिवाळीसाठी आणि आता कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांना या संपाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

बेस्ट प्रशासनाची संपकरी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा सुरु

या संपाबाबत बेस्ट प्रशासनाने सांगितलं की, कर्मचाऱ्यांच्या खात्यात कालच, २१ ऑक्टोबरला दिवाळी बोनसची रक्कम जमा झाली. परंतु संपकरी कर्मचारी हे कंत्राटी असून त्यांच्या बोनस आणि पगार संदर्भात निर्णय कॉन्ट्रॅक्टर घेत असतात. यात बेस्ट प्रशासन हस्तक्षेप करत नाही. मात्र तरीही संपकरी कंत्राटी कर्मचाऱ्यांशी बेस्ट प्रशासन चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे असं स्पष्टीकरण बेस्ट प्रशासनाने दिलं आहे. संपावर तोडगा निघेपर्यंत जे कायमस्वरूपी बेस्ट कर्मचारी आहेत ते अधिकच्या बस चालवून प्रवाशांना याचा फटका बसू न देण्याचा बेस्ट प्रशासनाचा प्रयत्न आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : 48 तासांसाठी विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Viral Video : मैदानात मुलांसोबत फुटबॉल खेळणारी गाय; व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल

मोठी बातमी! रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली, पाकिस्तानची बोट असण्याची शक्यता

Monday Horoscope : सावधान! वेळ आणि पैसा वाया जाणार; 5 राशींच्या लोकांची चिंता वाढवणार

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

SCROLL FOR NEXT