Pune-Mumbai Expressway News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी, सलग सुट्ट्यांमुळे बोरघाटात 12 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा..

दिलीप कांबळे

Mumbai-Pune Expressway News: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सकाळपासून वाहतूक कोंडी झाली आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई कडून पुण्याकडे येणारी वाहतूक संथ गतीने सुरू.

खंडाळा बोरघाटात तब्बल बारा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. शनिवार, रविवार आणि 15 ऑगस्ट अशा सलग सुट्ट्या आल्यामुळे पर्यटकांनी आपले खाजगी वाहन रस्त्यावर आणले आहे. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सलग सुट्टी आल्याने लोणावळा महाबळेश्वर कोल्हापूर अशा पर्यटन स्थळे जाऊन सुट्टीचा आनंद हे पर्यटक करीत आहे. दरम्यान, वारंवार प्रशासनाच्या वतीने विनंती करूनही पर्यटक आपल्या खाजगी वाहनाने प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबईहून पुण्याकडील जाणाऱ्या लेन वर बोरघाटात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत.  (Latest Marathi News)

दरम्यान, मागल्या महिन्यातमुंबई-पुणे एक्स्प्रेसवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या होत्या.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी गावाच्या हद्दीत 23 जुलै रोजी रात्री दरड कोसळली होती. त्यामुळे डोंगरभागातून मातीचा लगदा महामार्गावरील तिन्ही लेनवरती पडला. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT