Mill Workers News Saam Tv
मुंबई/पुणे

Mill Workers News: गिरणी कामगारांना घरं आणि वारसांना मिळणार नोकरी, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Cm Eknath Shinde News: गिरणी कामगारांना घरं आणि वारसांना मिळणार नोकरी, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Satish Kengar

Mill Workers News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गिरणी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकीत गिरणी कामगारांच्या घरासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

ते म्हणाले आहेत की, गेल्या अनेक वर्षांपासून गिरणी कामगार घरापासून वंचीत आहेत. गिरणी कामगारांना घर आमचं सरकार नक्की देणार. गावाजवळ जे गिरणी कामगार घर घेण्यास तयार आहेत, त्यांना तसं दिलं जाईल.

5000 घरची लॉटरी निघणार

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईतील अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. त्याला वेग दिला जाईल. एनटीसीच्या जागेवर धोरण बदलून घर कशी देता येतील याचा प्रयत्न केला जाईल. 5000 घरची लॉटरी लवकर काढू, असंही ते म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

गिरणी कामगारांच्या वारसांना मिळणार नोकरी

मुख्यमंत्री इकनाथ शिंदे म्हणाले की, म्युझियमचं काम सुरु आहे. त्याठिकाणी गिरणी कामगारांच्या वारसांना नोकऱ्या देण्यात येतील. अशी चर्चा या बैठकीत झाली, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, या बैठकीला मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार धैर्यशील माने, राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर, अतुल भातखळकर, सुनील राणे, प्रकाश आबिटकर, मंगेश कुडाळकर, प्रकाश आवाडे, माजी आमदार नरसय्या आडम, मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, गोविंदराज यांच्यासह गिरणी कामगार संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT