Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात (Accident) झाला आहे. हा भीषण अपघात खोपोली जवळ झाल्याची महिती समोर आली आहे. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे. अपघात 7 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. बसला कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे एक्स्प्रेसवर वाहतुकीची कोंडी झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेल्या बसला (Bus) एका मोठ्या कंटेनरने जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरदार बसली की बसच्या मागील भागाचा चक्काचूर झाला. यात कंटेनरचे देखील नुकसान झाले. बस चालक या अपघातात वाचू शकला नाही. धडक जोरात बसल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला. बसमध्ये एकूण ३५ प्रवासी आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आणखीन १० ते १२ व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याचे समजले आहे.
ही बस सिंधुदुर्गमार्गे लग्नाला गेली होती. तेथून परत येत असताना ही दुर्घटना घडली आहे. अपघात झाल्याने रस्यावरील वाहतून वराच वेळ विस्कळीत झाली होती. अशात पोलिसांच्या प्रयत्नाने वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.