Sharad Pawar/ Dilip Walase Patil Saam TV
मुंबई/पुणे

Breaking : फडणवीसांच्या आरोपानंतर गृहमंत्र्यांनी घेतली पवारांची भेट (पहा Video)

फडणवीस यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे सत्ताधाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’ टाकून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिलीय. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील यांच्यावर फडणवीसांनी गंभीर आरोप केले आहेत. सरकारकडून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखलं जात असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि याबाबतचे त्यांनी पुरावे देखील जाहीर केल्याने सत्ताधाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

पहा व्हिडीओ -

या प्रकरणामुळे अनेक मंत्री अडचणीत येणार असल्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या आरोपांमुळे सत्ताधारी चांगलेच हादरलेले दिसतायत. या प्रकरणावरती बोलण्यास गृहराज्य मंत्र्यांनी नकार दिला आहे. तर या आरोपांबाबत बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) म्हणाले की अजून मी व्हिडीओ पाहिले नाहीत. उद्या मी यावर उत्तर देईन. व्हिडीओची सत्यता पडतळावी लागेल. जे आरोप झालेत त्यावर उद्या सविस्तर बोलेन, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं असलं तरी उद्या उत्तर देण्याआधी ते महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चांना उधान आलं आहे.

Edited By - jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली, थंडीचा कडाका जाणवणार; पंखे, कुलर, एसी बंद

Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

Mumbai Crime : केमिकलचे स्प्रे मारून कुत्र्याचा डोळा केला निकामी; भांडुपमधील महिलेचं घृणास्पद कृत्य, पोलिसांत गुन्हा

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

SCROLL FOR NEXT